UMARKHED / ढाणकी येथे बस थांबा फलकाचे अनावरण.
ढाणकी प्रतिनिधी :महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाने खाजगी व अवैध प्रवासी वाहतुकीवर मात करण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहे,खाजगी वाहनांमधून होणारी प्रवाश्यांची गर्दी कमी करून एसटी महामंडळाकडे प्रवाश्यांना आकर्षित करून अधिकचे उत्पन्न वाढविण्यासाठी ‘हात दाखवा बस थांबवा’ ही कल्पना अमलात आणली आहे. म्हणून ढाणकीतील प्रवाश्यांना महामंडळ बस ची सुविधा देण्यासाठी ढाणकी येथील माधवराव मिटकरे प्रवाशी मंडळ आणि युवा ग्रामीण पत्रकार संघ ढाणकी यांच्या पुढाकारणे आज दिनांक 28 नोव्हेंबर ला “बस थांबा” फलकाचा अनावरण कृषि उत्पन्न बाजार ढाणकी येथे करण्यात आला. फलकाचा अनावरण युवा ग्रामीण राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार आणि बिटरगाव पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवाजी टिपूर्णे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी उपस्थित बस वाहतूक ढाणकी नियंत्रक सुरेश मोरे, युवा ग्रामीण संघ ढाणकी अध्यक्ष अशोक गायकवाड,माधवराव मिटकरे प्रवाशी मंडळ अध्यक्ष शेख इरफान, महेबूब शेख, कैलास घुगरे, इरफान शेखजी, अजीज खान, बंटी फुलकोनडवार, प्रशांत अरेवाड,मिलिंद चिकाटे, करण भरणे,धनंजय मिटकरे ,कांता मिटकरे, विनोद गायकवाड, संजय सल्लेवाड, हिरासिंग चव्हाण व गजु मिटकरे उपस्थित होते.