पोखरी येथील पूरग्रस्त महिला धडकल्या तहसील कार्यालयावर. तात्काळ मदत देण्याची केली मागणी
मागील ४० ते ४५ दिवसापूर्वी पडलेल्या पावसाने महागांव तालुक्यातील पोखरी येथे नागरीकांचे अत्यंत नुकसान झाले. अनेकांचे घरे पडले, घरात पाणी साचून अन्य धान्य कपडे वाहून गेेले. राहण्यासाठी घर उपलब्द नव्हते तर दूसऱ्यांच्या घरी व शाळामध्ये ४ ते ५ दिवस पूरग्रस्त नागरीकाने काढले. अशा अवस्थेत गावामध्ये ज्या
नागरीकांचे काही नुकसान झाले नाही अश्या नागरीकांना मदत मीळाली, व ज्या नागरीकांचे नुकसान झाले अश्यांना मदत मीळाली नाही त्या मुळे संतत्प गावातील महीलानी व नागरीकांनी तहसील कार्यालयावर धडक दिली. व तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी केली. त्या वेळेस रत्नाबाई वसंता साखरे, शांताबाई गजानन बोंबले, भोपा रामजी राठोड, दिगांबर नथुजी चिबडे सह गावातील अन्य महिला व नागरिक उपस्थित होते.
महागाव तालुका विशेष प्रतिनिधी: लतिफ शेख