महागाव तालुक्यातील वाकान येथे कुलरचा शाॅक लागुन शेतकऱ्याचा मृत्यू.
महागाव तालुक्यातील वाकान येथे घरातील कुलरचा शाॅक लागुन शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली रसेंद्र काळु चव्हाण (वय ४५) रा, वाकान असे मृतकाचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे की काल शुक्रवारी १८ अगस्त रोजी वाकान येथील शेतकरी रसेंद्र काळु चव्हाण हे दुपारी शेतातील कामे आटोपून घरी आले व घरातील कुलर सूरू करतेवेळी अचानक त्यांना जबर शाॅक लागला त्यांना तातडीने पुसद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला अचानक घडलेले या घटनेने संपुर्ण वाकानवासी शोक व्यक्त करीत असून परिसरात हळहळ व्यक्त होतं आहे, मृतक यांचे पश्चात पत्नी दोन मुली व एक मुलगा आणि बराच मोठा परिवार आहे.
महागाव तालुका विशेष प्रतिनिधी: लतिफ शेख