महागांव तालुक्यातील पूरग्रस्त गावांना संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांची भेट.
महागाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य अती मुसळधार 331 मी.मी.पावसामुळे,अतिवृष्टीमुळे तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा,पुस, शिप नद्यांना खूप पूर येऊन अक्षरशः शेतातून गेलेल्या अतीप्रवाहामुळे जमिनी सरासरी 6-7 फुटापर्यंत खरडून गेल्या..त्यामुळे खरीप हंगाम व सुपीक माती वाहून गेली.शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरात पाणी शिरले होते .जमिनी खरडून गेल्या आहेत. दुकानात सुद्धा पाणी भरले होते.त्यामुळे शेतकऱ्यांचे सांत्वन करण्यासाठी त्यांना धीर देण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री मनोज दादा आखरे यांनी गुंज, खडका, लेवा, काऊरवाडी,अंबोडा हिवरा ,आनंदनगर, थार कवठा या गावात जाऊन प्रत्यक्ष शेतीची व घरांची पाहणी केली, शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या व शेतकरी बांधवांना संभाजी ब्रिगेड नेहमी आपल्या पाठीशी आहे.आपल्याला जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी व आपल्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासन दरबारी प्रश्न मांडेल असे आश्वासन दिले. या पूरग्रस्त गावांच्या शेतकऱ्यांच्या भेटी प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर देशमुख, मराठा सेवा संघाचे श्रीकांत देशमुख, डॉ. संदीप शिंदे, प्रमोद जाधव ,संभाजी ब्रिगेडचे आशिष गावंडे, विजय देशमुख ,सतीश ठाकरे, केदार पानपट्टे, अमृत पॅटर्न चे जनक अमृतराव देशमुख, शेतकरी दत्तराव कदम ,अनिल देशमुख ,संदीप कानडे, मुन्ना भगत ,गणेशराव पाटील, बालू देशमुख, साहेबराव खंदारे, अनंता कदम, डॉ. धोंडीराम बोरुळकर, अरविंद देशमुख, समाधान इंगळे, बाळू सोनुने तथा सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते.
महागाव तालुका विशेष प्रतिनिधी: लतिफ शेख