ताज्या घडामोडी

अनाथ जोडप्याचं लावून दिले सीमा शिवाजीराव माने परिवाराने लग्न

अनाथ जोडप्याचं लावून दिले सीमा शिवाजीराव माने परिवाराने लग्न

माणसाने माणसाशी माणसा सम प्रमाणे वागावे या संत तुकाराम महाराजांच्या उक्ती प्रमाणे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी माने व त्यांच्या पत्नी सीमा माने यांनी कु .राजनंदिनी आणि राहुल लथाड या आदिवासी विवाह योग्य वय असणाऱ्या जोडप्यांचा विवाह संपन्न केला .

राजनंदिनी दत्ता शिंदे ह्या मुलीचे आई वडील आणि आजोबा हे कुटुंबामधील चारही व्यक्ती अवघ्या पाच महिन्यात एका मागून एक मयत झाल्यामुळे ती अनाथ असलेल्या राजनंदनी सह तिचा भाऊ या तीन अपत्याचे शिवाजी माने व सौ सीमा माने यांनी अर्ध दत्तक घेऊन त्यांच्या आरोग्य ,शिक्षण व सर्व प्रकारची जबाबदारी स्वीकारून आज अनाथ असणाऱ्या राजनंदनी चा नागापूर रूपाला येथील राहुल ल थाड या तरुणाची विवाह लावून दिला .याप्रसंगी डॉ . विजयराव माने ,डॉ .श्रीकांत पाटील आमदार नामदेव ससाणे,माजी आमदार विजयराव खडसे इत्यादी मान्यवरासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती व हजारोच्या सामुदायांनी या नवदापत्यांचा विवाह संपन्न झाला व त्यांना शुभेच्छा दिल्या

याप्रसंगी वधू-वरांना शुभेच्छा देताना डॉक्टर श्रीकांत पाटील म्हणाले की शिवाजी माने हे बहुजनाची नाळ जुळून असणारे व्यक्तिमत्व असून आजवर त्यांनी बहुजनाच्या हितासाठी वेळेनुरूप अनेक कार्यक्रम व कार्य केले आहे परंतु आजच्या हा मराठा असणाऱ्या शिवाजी माने यांनी आदिवासी समाजातील अनाथ मुलीचा विवाह अगदी थाटामाटात करून समाजापुढे आदर्श निर्माण केला .सुधाकर लोमटे यांनी तर शिवाजी मानेचे कार्य हे बहुजन राष्ट्रपुरुषाच्या विचार कार्यावर चालणारे असून हे प्रशासनीय आहे असे मत व्यक्त केले तर उपस्थित त्यांचे आभार मानताना मी ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचा काहीतरी देणं लागत या भावनेतून मी हे जे काम केलेले आहे हे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले बहुजन प्रतिपालक शिवाजी महाराज ,डॉ .बाबासाहेब आंबेडकर ,अण्णाभाऊ साठे शाहू महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या विचारावर व कार्यावर एक छोटस पाऊल असून मी काही फार मोठे कार्य केले नाही या सर्व राष्ट्रपुरुषांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून सामाजिक कार्य केलेली आहे त्यांचा आदर्श घेऊन हे काम केल आहेअशी भावना शिवाजी माने यांनी व्यक्त करून गावकऱ्यांचे व ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सहकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले .

 

उमरखेड तालुका प्रतिनिधी विजय कदम

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *