हिमायतनगर पोलीसांची धाडसी कार्यवाही..चोरीच्या गाडीवर दुसरी जबरी चोरी करणाऱ्या एका आरोपीस अटक..
हिमायतनगर : एस के चांद यांची रिपोर्ट
हिमायतनगर तालुक्यातील पार्डी येथे बचत गटाची बैठक उरकून फिर्याद शिवाजी सखाराम भालेराव हे हिमायतनगर कडे येत असताना त्यांचा पाठलाग करून 3 अज्ञात युवकांनी त्यांच्या जवळील बॅगेत असलेले पैसे व कार्यालयीन सामान चोरी करून ते पसार झाल्याची घटना दि 17 जून रोजी घडली होती त्यानुसार हिमायतनगर पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीवरून येथील पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भुसनर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी व पोलीस नाईक विजय आऊलवार यांनी वडगाव परिसरात सापळा रचून अवघ्या 24 तासात जबरी चोरी करणाऱ्या एका आरोपीचा पाठलाग करून त्याला अटक केले तेव्हा मोटार सायकल चोरीचा दुसरा गुन्हा पण सिद्ध झाला तेव्हा हिमायतनगर पोलीस स्थानकात गु.र.न.140/22 कलम 392,34 भा.द.वी प्रमाणे आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे इतर आरोपींना लवकरच पकडण्यात येईल असे सांगण्यात आले
याबाबत सविस्तर वृत्त असे की मागील काही दिवसापासून हिमायतनगर तालुक्यात मोटारसायकल चोरीच्या घटना वाढत होत्या त्यामूळे नूतन पोलीस निरीक्षकानी चोरीच्या घटनेचे जुने रेकॉर्ड तपासत संबंधित परिसरात झालेल्या चोरीच्या घटना व त्यांची चौकशी करत पदभार स्वीकारल्यापासून अनेक गुन्ह्याचा खुलासा केला आहे त्यात नुकत्याच झालेल्या पार्डी येथील जबरी चोरी करणाऱ्याचा सुद्धा त्यांनी तपास लावला आहे त्यात नमूद आरोपीने काही दिवसापूर्वी सोनारी येथील रामदास पाटील यांची मोटारसायकल चोरी केली होती व त्याच मोटार सायकलचा वापर करून दि 17 जून रोजी पार्डी येथे बचत गटाचे काम उरकून हिमायतनगर कडे येणाऱ्या एका कर्मचाऱ्यांची बॅग चोरी करून पुन्हा दुसरी जबरी चोरी केली ह्याची फिर्यादिने पोलीस स्टेशनला नोंद करताच हिमायतनगर येथील पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी व पोलीस नाईक विजय आऊलवार यांनी वडगाव परिसरात सापळा रचून अवघ्या 24 तासात आरोपी शेख बबलू शेख वखील वय 19 ह्यास मुद्दे मालासह अटक केले तेव्हा त्यासोबत असलेले इतर आरोपी फरार झाले तेव्हा जबरी चोरी करणाऱ्या आरोपी विरोधात हिमायतनगर पोलीस स्थानकात गु.र.न.140/22 कलम 392,34 भा.द.वी प्रमाणे चोरी चा गुन्हा दाखल केला व अगोदरच्या मोटार सायकल चोरीची गुन्हा उकल झाल्याने त्याच आरोपी विरोधात गु. र. न.137/22 कलम 379 प्रमाणे मोटार सायकल चोरीचा सुधा गुन्हा नोंद करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक भुसनर यांनी सांगितले
यावेळी सबंधित चोरीच्या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक भुसनर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी ,पोलीस नाईक विजय आऊलवार, बिट जमादार अशोक सिंगनवाड,हेमंत चोले,कुलकर्णी हे करीत आहेत