क्रीडांगण

पंचायत समिती महागाव मौजे जनुना शाळेमधून २ विद्यार्थिनीची महादीप जिल्हा स्तरीय स्पर्धा परीक्षेमध्ये यांची निवड.

पंचायत समिती महागाव मौजे जनुना शाळेमधून २ विद्यार्थिनीची महादीप जिल्हा स्तरीय स्पर्धा परीक्षेमध्ये यांची निवड.


यवतमाळ प्रतिनिधी / एस के शब्बीर

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जनुना, येथून महागाव तालुक्यात महादीप स्पर्धा परीक्षांमध्ये १२केंद्र पैकी १४७ शाळेमधून निवडलेले २० विद्यार्थ्यांपैकी मौजे जनुना या गावातील दोन विद्यार्थिनी तालुका स्पर्धा परीक्षांमध्ये ५ व्या वर्गा मधून निवड झाली आहे. महागाव तालुक्यातील मौजे जनुना या शाळेचे नाव झळकवणारी विद्यार्थिनी कु.सानिका दादाराव वाठोरे व कु.मयुरी संजय वाठोरे, जिल्हा स्पर्धा परीक्षा मध्ये निवड झालेल्या जि.परिषद प्राथमिक जनुना शाळेमध्ये शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व गावकऱ्यांनी या दोन मुलीचे कौतुक करून त्यांचे फुल गुच्छ देऊन यावेळी त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आले व गावकऱ्यांनी शाळेचे मुख्याध्यापक एस आर शिंदे व एस जे चव्हाण सर यांनी महागाव तालुक्यात छोट्याशा गावांमध्ये दोन विद्यार्थिनी हिऱ्या सारखे चमकावीले व तालुका तरच काय जिल्हा स्थळावर दोन विद्यार्थ्यांना पोहोचविले त्यासाठी शिंदे सर व चव्हाण सर यांचे कौतुक करून त्यांचेसुद्धा फुल गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

स्वागत करताना माजी तंटामुक्ती अध्यक्ष, श्री, बापुराव रामा दवणे, शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष, संजय रामराव वाठोरे, ग्राम पंचायत सदस्य, ज्ञानेश्वर कोंडबा इंगोले,व या कार्यक्रमाचे सूत्रधार, एस,आर,शिंदे( मुख्याध्यापक ) एस जे चव्हाण, ( शिक्षक) व गावातील कार्यकर्त्यांनी या दोन मुली साठी आपले मन व्यक्त केले व पुढील परीक्षा करिता, सानिका, व मयुरी, यांना वाटचालीस परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *