आरोग्य

लिंबगाव पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर संपन्न; संविधान दिन व २६/११ चे निमित्त

लिंबगाव पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर संपन्न; संविधान दिन व २६/११ चे निमित्

 

अर्धापूर /खतीब अब्दुल सोहेल

 

भारतीय संविधान दिन आणि २६/ ११ या मुंबई हल्ल्यातील शहिदांना अभिवादनानिमित्त लिंबगाव पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

 

लिंबगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात २६/११ या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना, निष्पाप नागरिकांना अभिवादन करून भारतीय संविधान दिनानिमित्त भारतीय राज्य घटनेच्या उद्देशिकेचे वाचन करून रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराला लिंबगाव परिसरातील रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुरुवातीला शहिदांना दोन मिनिटे स्तब्द उभे राहून श्रद्धांजली दिली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी (ग्रामीण) अर्चना पाटील यांनी शहिदाच्या प्रतिमांना पुष्पचक्र अर्पण केले. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांनीही शहिदांना अभिवादन केले. सकाळी नऊ वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जवळपास दिडशेहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून शहीदांना अभिवादन केले.

यावेळी

साहेबराव धनगे, मिलिंद देशमख, रेखा धनगे, विठ्ठल पावडे, विश्र्वास कदम, संतोष शिरसगर, जयवंत कदम, हिंगमिरे महाराज, बालाजी सूर्यवंशी, संतोष भोसले, धनंजय सूर्यवंशी, बाबासाहेब पाटील, संतोष भरसावडे, राजेश बोकारे, गणेश बोकारे, कमलेश पाटील, सुनील पाटील, भरत पाटील, प्रशांत कदम, सतीश कदम, अनिल कदम, रतन भालेराव प्रतिष्ठित नागरिक आणि लिंबगाव पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *