ताज्या घडामोडी

पळसपुर येथे नविन विद्युत तारा तात्काळ बसवण्यात याव्या महावितरणकडे नागोराव शिंदे यांची मागणी

पळसपुर येथे नविन विद्युत तारा तात्काळ बसवण्यात याव्या महावितरणकडे नागोराव शिंदे यांची मागणी

 

नांदेड हिमायतनगर / नागोराव शिंदे 

 

हिमायनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील विद्युत पुरवठा सतत खंडीत होत आहे याला सर्वस्वी करणीभूत येथील विजेच्या तारा आहेत.

कारण ह्या तारा मागील साठ वर्षापासून बदललेल्या नाहीत. जुनाट विद्युत तारा पळसपुर गावात ठिकठिकाणी लोबकळत असल्याच्या दिसून येत आहेत. ह्या तरांचा एकमेकांना स्पर्श होऊ नये यासाठी लाकडे बांधण्यात आलेले आहेत.

जुनाट तारा असल्यामुळे सतत तुटून पडत असल्याने गावातील नागरीकांच्या जीवीताला धोका निर्माण झाला आहे. आता ह्या तारा बदलण्याची वेळ आली आहे. गावात विद्युत पुरवठा करण्यासाठी नविन विद्युत तारांची आवश्यकता आहे, जर नविन तारा गावात बसवल्या तर विद्युत पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार कमी होतील. तसेच एल. टी. वायरींग थ्रिफेस विद्युत रोहीत्र आणि नविन तारा बसवण्यात याव्या यासाठी आत्मनिर्भर भारत अभियान संघटनचे नांदेड जिल्हाध्यक्ष नागोराव शिंदे, माजी उपसरपंच माधव देवसरकर यांनी कार्यकारी अभियंता मोहनराव गोपुलवाड महावितरण भोकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *