नांदेड / हिमायतनगर धानोरा शिवारात आखाड्यावर विज पडून दोन बैल ठार.
हिमायतनगर/ नागोराव शिंदे यांची रिपोट
गुरूवारी दिनांक 23रोजि सायंकाळी झालेल्या मुसळधार पाऊस त्यामध्ये विंजाचा कडकडाट त्यामध्ये बोरगडी येथील शेतकरी यांच्या धानोरा शिवारातील आखाड्यावर बांधून असलेल्या दोन बैलावर अचानक विज कोसळून जनावरे जागीच गतप्राण झाली असल्याची घटना घडली असून शेतकऱ्यांवर मोठे संकठ कोसळले आहे.
हिमायतनगर तालुक्यात दोन दिवसापासून मुसळधार पाऊस होत असून या पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. गुरूवारी दुपार पासून मुसळधार ते अति मुसळधार पाऊस सुरू झाला होता. विजांच्या कडकडाटासह धुव्वाधार पावसात बोरगडी येथील रहिवासी शेतकरी अकुंश सदाशिव कोळगीर यांच्या धानोरा शिवारातील आखाड्यावर बांधून असलेल्या दोन बैलावर विज कोसळून जागीच गतप्राण झाल्याची घटना घडली आहे. सदरील घटना सायंकाळी 7:30 वा. घडली आहे. ऐन शेती कामाच्या मोसमात शेतकऱ्यांची लाखो रुपयांच्या किमतीची बैल जोडी नैसर्गिक आपत्ती मुळे गेल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. सदरील घटनेचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तात्काळ तहसील प्रशासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकर्यानि
केली आहे