राजकारण

हिमायतनगर येथील दिव्यांगाना आमदार माधवराव पाटील यांच्या हस्ते साहित्याचे वाटप 335 दिव्यांगांना मिळणार साहित्य

हिमायतनगर येथील दिव्यांगाना आमदार माधवराव पाटील यांच्या हस्ते साहित्याचे वाटप
335 दिव्यांगांना मिळणार साहित्य

ब्योरो रिपोट हिमायतनगर /एस.के.चांद

सामाजिक न्याय व अधिकारिता विभाग दिव्यांगजन सशक्तीकरण व भारत सरकार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत समाज कल्याण विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक अधिकारिता शिबिराचे आयोजन हिमायतनगर येथील परमेश्वर मंगल कार्यालय येथे पंचायत समिती कार्यालयाकडून दिनांक 1 जुलै ते 2 जुलै यादरम्यान करण्यात आले यावेळी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते दिव्यांगांना साहित्याचे वाटप करून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती आडे हे होते तर उद्घाटक हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जळगावकर हे होते तर प्रमुख पाहुणे हदगाव येथील उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर साहेब, तहसीलदार गायकवाड, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुदीश मांजरमकर साहेब,माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, माजी नगराध्यक्ष अब्दुल अखिल, काँग्रेस तालुका अध्यक्ष विकास पाटील ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रफीक सेठ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पोहरे,हे होते यावेळी बोलताना आमदार माधवराव पाटील जवळगावकर म्हणाले की तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळेल कोणत्याही बांधवावर अन्याय होणार नाही केंद्र व राज्य शासनाच्या सर्व शासकीय योजनांचा लाभ त्यांना देण्यात येईल व तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीने दिव्यांगावर पाच टक्के निधी खर्च केलाच पाहिजे अशा सूचना पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना यावेळी दिल्या
या साहित्य वाटप कार्यक्रमांमध्ये एकूण अंदाजे 335 साहित्यांचे वाटप करण्यात आले त्यामध्ये बॅटरी च्या मोटरसायकल सहा, 83 सायकल, 150 काठ्या, कमोड 16, व्हीलचेअर 183, पेटी नग 4, 86 नो.1, असे अंदाजित 335 साहित्याचे वाटप हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील यांच्या हस्ते 1 जुलै रोजी परमेश्वर मंदिर मंगल कार्यालय येथे हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयाकडून करण्यात आले आहे

यावेळी हदगाव येथील उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर साहेब, तहसीलदार गायकवाड साहेब,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुदीश मांजरमकर साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, काँग्रेस तालुका अध्यक्ष विकास पाटील देवसरकर ,माजी नगराध्यक्ष अब्दुल अखिल,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रफीक सेठ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पोहरे, क्षीरसागर साहेब, गायकवाड साहेब, बाकी सेठ, सूर्यवंशी सर, व पंचायत समितीचे कर्मचारी व्ही. ए. दमकोंडवार साहेब, एस डब्ल्यू पांचाळ साहेब, टी.बी. आडे , सुडे एम टी, बच्चेवार, हिवराळे, विंचुरकर, वाघमारे , वानखेडे ,गुंडेकर, जंगलवाढ ,बेंडाळे, जिंगले ,पतंगे सह पंचायत समितीचे आदी कर्मचारी यावेळी उपस्थित होते

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *