अर्धापूर / खतीब अब्दुल सोहेल
अर्धापूर येथे मागील २० वर्षापासून बालरोगतज्ज्ञ म्हणून वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर जाकेर अली यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड द्वारे पीएच.डी. पदवी प्रदान.
डॉ.जाकेर इनामदार हे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असताना त्यांना साहित्याची आवड लहानपणापासूनच होती त्यामुळे त्यांनी उर्दू साहित्यातून पदव्युत्तर शिक्षण घेतले व नंतर वैद्यकीय सेवा देत-देत संशोधन कार्य पूर्ण केले. त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथून An Analytical study of Urdu Historical Novels हे संशोधनविषय घेऊन उर्दू या विषयात आझाद कॉलेज औसा येथील प्रा.डॉ. नासीरउल्ला अन्सारी यांच्या मार्गदर्शनाखाली शोधप्रबंध सादर केला होता, त्याचे परीक्षण करून विद्यापीठाने काल दिनांक २९ मे रोजी ऑनलाईन मुलाखतीद्वारे पीएच.डी. पदवी प्रदान केली. त्यांच्या या यशाबद्दल माजी सभापती तथा नगरसेवक मिर्झा अख्तरउल्ला बेग, शंकरराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.के. पाटिल, ग्रंथपाल मधुकर बोरसे, विद्यापीठाचे अधिक्षक लेखापाल अब्दुल शकील, म.अल्ताफ हुसेन, डॉ.हनुमंत भोपाळे, डॉ. जे.सी.पठाण, डॉ. विलास चव्हाण, प्रा.रघुनाथ शेटे, प्रा.डॉ. सरदार पाशा, प्रा.डॉ.काझी मुख्तारोद्दिन, प्रा.मोहम्मद इस्माईल प्रा.डॉ जावेद इकबाल, डॉ.शेख अतीक, डॉ शेख नबील, डॉ मुकीम सिद्दीकी, यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील सर्व डॉक्टर्स महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापक व मित्रमंडळ यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.