प्रतिनिधी उमरखेड:-
वसुंधरारत्न , राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे दि.१-०९ -२०२० रोजी दुपारी नांदेड येथील नारायणा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान वयाच्या १०४ व्या वर्षी निधन झाले.त्यांच्या जाण्याने संपूर्ण परिसरामध्ये शोककळा पसरली आहे.श्रीक्षेत्र भक्तीस्थळ ( अ . पूर ) येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. जगतज्योती बसवेश्वर महाराज संस्थान संगम चिंचोली येथे महाराजांना गावकऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली . त्यावेळी बोलताना शुभम कळलावे हे असे म्हणाले की , आदरणीय गुरुवर्य आप्पा यांच्या जाण्याने सर्व समाजबांधवांचे अतोनात नुकसान झाले आहे.आपल्या परिसरातील आध्यामित छत्र हरवले असे शुभम कळलावे ह्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.त्यापुढे शुभम कळलावे म्हणाले कर्नाटक , तेलंगणा या राज्यात त्यांचे अनेक भावीक भक्त आहेत , त्यांचा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग होता.लाहोर विद्यापीठात स्वतंत्र पूर्व काळात एमएमबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे . लिंगायत धर्म प्रसारात ते सतत कार्यरत राहिले . वृक्ष जोपासना , राष्ट्रधर्म , राष्ट्रप्रेम या त्रिसूत्रीवर त्यांनी काम केले आहे . लिंगायत स्वतंत्र धर्म आंदोलनात त्यांची भूमिका आणि सहभाग महत्वाचा होता . यासाठी राज्यभर लाखोंच्या मोर्चाचे त्यांनी नेतृत्व केले होते.त्यांनी काही ग्रंथरचना करून मराठी वीरशैव साहित्यात भर घातली आहे . की.भारतीय संस्कृतीमध्ये जगाला उन्नत महाराष्ट्रात शिवसांप्रदायिक कीर्तन ते स्वतः करण्याची ताकद आहे . या जगात संत करत.अनेक कीर्तनकारांना तयार करण्याचे आणि आध्यात्मिक गुरूंकडे जगाला श्रेय त्यांना जाते . ‘ श्रीसिद्धान्तशिखामणी’वर दिशा दाखविण्याचे सामर्थ्य आहे . देशाला संस्कृत व्याख्या लिहिणारे पंडित अभिमान वाटावा अशी ‘ गुरुमाऊली ‘ त्यांची ख्याती आहे.असे असंख्य उपक्रमात राष्ट्रसंत , वसुंधरारत्न परमपूज्य डॉ.शिवलिंग गुरुवायांनी केले त्याचे अगणित असे शिवाचार्य महाराज होते . त्यांचे लिंगऐक्य कार्य आहे .*१०४ वर्ष एवढं दीर्घायुषी एक महान तपस्वी,आध्यत्मिक वीरशैव संप्रदायाचे गाढे अभ्यासक,उच्चविध्याविभूषितआणि विशेष राष्ट्रीयस्वयंसेवक संघाचे वयोवृध्द स्वयंसेवक, प्रचारक राहलेले.आणि विशेष म्हणजे एक पूर्ण आध्यत्मिक योगी,द्वितीय सर संघचालक प.पु,माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी यांच्या सहवासातील,एक ऐतिहासिक सत्पुरुष इतिहासाच्या उदरात विसावला!आणि प्रदीर्घ १०४ वर्षाच्या आयुष्याचा कालखंड विसर्जित होऊन पंच तत्वात विलीन व्हावं आणि आम्ही मात्र निमुटपणे हळहळत हात चोळत बसाव!एवढा मोठा महान प्रदीर्घ अनुभवाचा ठेवा वीरशैवांजवळ असूनही आपण आप्पांच्या सहवासात बसून त्यांच त्यांच्या बालवया पासून तर आज अलीकडील काळापर्यंतच अनुभव कथन ऐकू शकलो नाही.एवढा मोठा इतिहास आपल्या नजरे समोरून पाहता पाहता काळाच्या उदरात सामावला. आणि मनात एक खूप मोठी पोकळी रुख रुख मात्र आता कायमची राहील ती कधीही विस्मणात जाणारच नाही.या असंघटीत वीरशैव समाज आणि अनावश्यक फाजील स्पर्धेपायी,आप्पाजींना ज्या समाजहिताच्या दृष्टीने धार्मिक सामाजिक कार्याला समाज बांधवांनी अहेतुक निरपेक्ष सहकार्य करून,या महान ऋषितुल्य सिध्द पुरुषाच्या आशीर्वादाने अधिक उन्नत होण्या करीता त्यांना मनोभावे समर्पित होण्या ऐवजी, भलंत्याच नको असलेल्या जबाबदारीच्या कार्यात गुरफटून ठेवले!आणि या सत्पुरुषाचा जो मूळ स्वानुभवाचा आध्यत्मिक गाभा होता त्यापासून समाजला वंचित केले.त्यांच्या चरणाशी बसून निवांतपणे आप्पाजिंच आत्मकथन ऐकलं असत,तेच परत लिपीबध्द करून आत्मचरित्र प्रकाशित केल असत,अनेकानेक विषय असतांना मात्र निव्वळ आपल्या भौतिक महत्वाकांक्षे पायी समाजधुरीनांनी समाज हिताचा जो मूळ आध्यत्मिक संस्काराचा विषय होता त्याचाच बळी घेतला.असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आता फक्त नि फक्त आठवणी बाकी काही नाही!खूप खूप कधीही भरून न निघणारी हानी वीरशैव समाजाची झाली आहे,हे शब्दात सांगण्या सारख नाही.येथे शब्द अपुरे तोकडे पडतात.ज्यांना आध्यात्माची साधनेची जाणीव आहे.तेच हे समजू शकतील.अन्यथा धर्माच्या नावावर सोंग उभं करून सद धर्माचा बळी घेणाऱ्या,अन् स्वतःच वैयक्तिक आपलं करिअर भविष्य जोपासणाऱ्या आणि अस्तित्व निर्माण करू पाहणाऱ्या विकृत धर्मवाद्यांना आप्पाजींचं वीरशैव समाज बांधवातून निघून जाण हे कधीही समजनारच नाही. त्यांच्या पूर्वसंकेतानुसारच ते गेलेत हे निर्विवाद!आप्पाजींच्या.श्री चरणापाशी परत एकदा साष्ठांग दण्डवत!