राजकारण

प्रधानमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून हिमायतनगर- पळसपुर -डोल्हारी रस्त्याच्या नवीन कामास मंजुरी .

 

सुधीर पाटील ऊप कार्यकारी अभियंता ना़देड यांची माहिती खासदार हेमंत पाटील यांच्या पत्राची घेतली दखल नागोराव शिंदे यांच्या प्रयत्नाला यश

नांदेड हिमायतनगर

हिमायतनगर ते पळसपुर- डोल्हारी- सीरपली रस्ता मागील २००७-८या वर्षांत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून रस्ता तयार करण्यात आला होता परंतु त्यानंतर रस्त्यांची मुदत संपल्यानंतर रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे परीणामी या रस्त्यांवर ये जा करणार्या शेतकरी व शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने वेळ प्रसंगी अपघात होण्याची वेळ नाकारण्यात येत नाही.या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यासाठी पत्रकार नागोराव शिंदे पळसपुरकर चादराव वानखेडे कोंडीबा कदम यांनी हिंगोली लोकसभेचे खा हेमंत पाटील यांच्या कडे मागणी केली होती.
या मागणीकडे विषेश लक्ष देऊन २८.१२.२०१९रोजी पत्र क्र.१०५५ मा.कार्यकारी अभीयंता
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना नांदेड यांना देऊन रस्ता मंजुर करण्यात यावा. अशी खासदार साहेबांनी पत्राद्वारे मागणी केली होती
या पत्र्याची दाखल घेऊन हिमायतनगर पळसपुर डोल्हारी रस्ता मंजुर झाला असून हिमायतनगर पळसपुर डोलारी पर्यंत दहा किलोमीटर रस्ता पूर्णता नव्याने हॉटमिक्स डांबरीकरण लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ऊप कार्यकारी अभियंता सुधीर पाटील यांनी आमच्या प्रतीनीधीसी बोलताना सांगितले
लवकरच काम सुरू करण्यासाठी रस्त्यांची पहाणी करण्यांत आली आहे असल्याचे आहे

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *