आरोग्य

पळसपुर चातारी जुना रस्त्यावरील पैन गंगा नदी वर बोरी शिवारात ट्रक्टर ची पलटी एक ठार एक जखमी

 

विशेष प्रतिनिधी / नागोराव शिंदे

तालक्यातील मौजे पळसपुर येथील परमेश्वर रघुनाथ सुर्यवंशी (हाडसनकर ) यांचे दि 28 च्या रात्री 9वा ज ताच्या सुमारास हदगाव येथे हरभरा घेऊन गेलेल्या ट्रॅक्टर डबल ट्रॉली पळसपुर येथे

बोरी शिवारातुन पळसपुर कडे येताना पेनगंगा नदीत उतरत असताना ट्रक्टरची पलटी होऊन प्रमेश्वर रघुनाथ सुर्यवंशी वय 42 जागीच ठार झाला.
सुरेश बाबुराव कदम
वय 40 वर्ष हे जखमि झाले आहे ते हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत

हदगाव ला हरभरा घेऊन गेले असता जवळच्या मार्ग बोरी रोडवरून पळसपुर २किमीअंतर असल्याने या कच्या रस्त्यावरून गावाकडे येत असताना नदित उतरताना हा अपघात झाला.हा अपघात स्थळ ऊमरखेड तालुक्यातील हद्दीत येत असल्याने ऊतरणीय तपासणी साठी प्रमेश्वर सुर्यवंशी याचा मूर्त देह रात्रीच उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले उमरखेड येथून उतरणे तपासणी केल्यानंतर पळसपुर येथे परमेश्वर सूर्यवंशी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती प्रथमदर्शनी सांगण्यात आले आहे परमेश्वर सूर्यवंशी यांच्या पश्चात वडील आई दोन भाऊ एक बहीण एक मुलगा एक मुलगी पत्नी असा त्यांचा परिवार असून यांच्या अपघाती निधनाने पळसपुर गावावर शोककळा पसरली आहे

आल्यावर पळसपुर येथे अंत्य संस्कार करण्यात येणार आहे

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *