प्रतिनिधी:- महागाव
कोरोनाच्या बंद चा फायदा घेऊन दारू विक्री तेजित,
पोलिस प्रशासनाचे मात्र साफ दुर्लक्ष वरिष्ठानि लक्ष देण्याची मागणी. यवतमाळ जिल्ह्यातील तालुका महागावं अंबोडा येथील नागरिक व गावातील सरंपच यांनी महागाव पोलीस स्टेशन ला अनेक वेळी निवेदन देऊन आत्ता पर्यंत त्या निवेदनाची अमल बजावणी नाही झाली चे आरोप,अंबोडा येथे दारूच्या 12 ते 13 हात भट्टी असून महागावं पोलिसांना ग्रामपंचायत तर्फे ठराव देऊन दारू भट्या बंद करावी असे निवेदन महागावं पोलिसांना दिल्यानंतरही त्यांच्याकडून कोणतीही कारवाही करण्यात आली नाही असे निवेदनात मनःटले आहे,या उलटं सर्व दारू भट्टी वाल्याकडुन प्रत्येक भट्टी मागे एक हजार रुपेये रोज जमादार सकाळीच येऊन जातात व मी असे पर्यंत बिंनधास्त अनधिकृत दारूचा व्यवसाय चालू द्या फक्त मला पैसे देत रहा असे निवेदनात मनःटले आहे,
महागावं तालुक्यातील कलगाव,सवाना,गुंज,कान्हा,शिरपूर, खडका,चिलगाव्हन,लेवा,वाघणात,करंजखेड,आशा अनेक ठिकाणचे लोक तालुक्यातून अंबोडा येथे येऊन दारू पित असल्यामुळे व या दारूच्या अड्ड्याजवळ जुगार चा डाव चालू असल्याने लाखो रुपयांची उल्हाढाल होत असून लॉक डाऊन मध्ये सोशल डिस्टिंग चा बोऱ्या वाजत आहे,गावामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, या सर्व कुर्त्यामुळे गावातील सामान्य नागरिक प्रचंड तणावाखाली असून त्यांचा कोणत्याही क्षणी उद्रेक होऊन शांतता भंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे निवेदनात म्हटले आहे,याबाबत गावातील नागरिक व सरपंच,उपसरपंच, यांनी मा,ठाणेदार यांना निवेदन दिले आणि ठाणेदार यांनी आश्वासन दिले,की उद्या पासून तुमच्या गावात दारूची भट्टी व जुगार चालणार नाही असे त्यांनी आश्वासन दिले होते ,परन्तु त्यांनी कुठलीही कारवाई नाही केली असे गावातील नागरिक व सरपंच उपसरपंच यांचे सांगणे आहे,
यवतमाळ येथील L.C.b चे प्रमुख शेळके साहेब यांनी गावातील नागरिक व सरपंच, उपसरपंच यांच्या सांगण्यावरून एकदा मोठ्या प्रमाणात धाड टाकून कारवाही केली होती,परंतु महागावं पोलीस दारूभट्ट्या वाल्यांना संरक्षण देत असून त्यांचे कडून रोज हजारो रुपयांची वसुली करीत असल्याने त्यांना पाठबळ मिळत आहे असल्याने त्यांच्यावर तात्काळ कारवाही करावी आपल्या स्थरावर करावी असे त्यांनी निवेदनात मन्हाले,
सदया महाराष्ट्र राज्यात कोरोना रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी कलम 144 जमाव बंदी कायदा लागु केला आहे,त्याची व आपत्ति व्यवस्थापन कायदा 2005 व मुंबई मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 142(1) नुसार जिल्ह्यात सर्व किरकोळ देशी मद्य विक्री बंदी असल्याचे पाहून महागाव शहरातील व ग्रामीण भागात अवैध हात भट्टी दारू विक्री करणाऱ्यानी त्यांचा धंदा मोठ्या तेजित सुरु केला आहे, त्या बाबी कडे स्थानिक पोलिस बिट जमादार व प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे आढळून येत आहे,
अंबोडा येथील चौक परिसरात अवैध हात भट्टी दारूची मोठ्या प्रमाणात तेजित सुरु असल्याची माहिती, गावातील सरपंच, व उपसंरपंच हनवतराव देशमुख यांनी निवेदनदुवारे दिली आहे, त्याचाच फायदा घेत शहरासह तालुक्यातिल ग्रामीण भागामध्ये अवैध हात भट्टी दारू विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढ, अल्पवयीन तरुणात व्यसनाचे प्रमाण खुप मोठ्या प्रमाणात वाढुंन अनेकांचे संसार उघड्यावर येण्याची गंभीर समस्या निर्माण होत आहे, या बाबी कडे राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांनी केलेल्या दुर्लषित पनामुळे महागाव शहर शासन निर्णयाच्या विरोधात जाऊन बे भाव दराने अवैध दारू वेळेत मिळत असल्याने पिऊन तर्रतर असणारे मद्यपि घरी पत्नी मुलाना चोपुन काढत आहेत, तर ग्रामीण भागातील काही महिला दारू बंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या महिलांना तक्रारी नंतर फार त्रास होतो, यामुळे कुणी तक्रार करण्यास पुढे येत नाही, पोलीसांन कडे वारवार अर्ज विनती करुण देखील शहरातील व ग्रामीण भागातील अवैध हात भट्टी, देशी दारू बंद होत नाही,
त्यामुळे नूतन जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक साहेब व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी महागाव शहराकडे व बाजूच्या ग्रामीण भागातील अंबोडा यांच्यावर जातींने लक्ष देऊन शहरात अवैध हात भट्टी , विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळाव्य अशी मागणी सुजान नागरिक व महिला वर्गातून मोठ्या प्रमाणात होत आहे,