क्राईम डायरी

चोरी गेलेले तीन लाख त्रेसश्ठ हजार डाॅ रावते यांना बिटरगांव पोलीसांनी केले परत.

चोरी गेलेले तीन लाख त्रेसश्ठ हजार डाॅ रावते यांना बिटरगांव पोलीसांनी केले परत.

ढाणकी प्रतिनीधी -:- शेख इरफान

जानेवारी महिण्यामध्ये डाॅ लक्ष्मीकांत रावते यांच्या घरी चोरी झाली होती. त्यामध्ये त्यांचे तीन लाख ऐंषी हजार रूपये चोरी ला गेल्याची तक्रार डाॅक्टर रावते यांनी बिटरगांव पोलीसामध्ये दिली होती. त्या चोरी चा तपास बिटरगांव पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय चव्हाण, रवी गीते व त्यांच्या सहका-यांनी अवघ्या दोन तासामध्ये लावला. त्यामध्ये त्यांनी ढाणकी येथिल तीन आरोपीला अटक केली. व त्यांच्या जवळुन तीन लाख त्रेसश्ठ हजार रूप्यांचा मुद्देमाल हस्तगत केला. डाॅ लक्ष्मीकांत रावते हे ढाणकी येथे सप्ताह चालु असताना सांयकाळच्या सुमारास सात वाजता हरीभक्त पारायण यांचे किर्तण एकण्याकरीता गेले असता त्यांच्या कडे कधीकाळी कंपाडर म्हणुन असणा-या नोकरांनेच डल्ला मारला. सदर रक्कमेमधील काही पैसे हे सप्ताह निमीत्त गावामध्ये जमा करण्यात आलेली देणगी असल्याने गावक-यांनी अवघ्या दोनच तासामध्ये चोरांना पोलीसांनी जेरबंध केल्याने आश्चर्य व्यक्त केले होते.
चोरीचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना न्यायालयाने डाॅ लक्ष्मीकांत रावते यांना तीन लाख त्रेसष्ठ हजार रूप्ये परत करण्याचे आदेष दिला. ती रक्कम डाॅक्टर लक्ष्मीकांत रावते यांना बिटरगांव पोलीस स्टेशन येथे बोलावुन दोन पंचा समक्ष परत केली. या वेळी पोलीस उपनिरीक्षक रामकिसन जायभाये, रवी गीते, व इतर कर्मचारी हजर होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *