हिमायतनगर येथील सिरंजणी येथे वीज पडून वळु ठार.शेतकऱ्यांचे तिस हाजार रुपयांचे नुकसान
नांदेड हिमायतनगर
नागोराव शिंदे
हिमायतनगर तालुक्यात आज दिनांक साहा रोज
झालेल्या अवकाळी पावसाने सायंकाळी पाच वाजता मेघगर्जनेसह पाऊस झाल्याने तालुक्यातील पाच किलोमीटर अंतरावरील सिरंजनी येथे वळु वीज पडून जागीच ठार झाला असल्याने
शेतकऱ्यांच्ये तिस हाजार रुपयांचे नुकसान झाले आहे
दिनांक 6 रोजी सायंकाळी पाच वाजता चे सुमारास मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाल्याने सिरंजनी तालुका हिमायतनगर येथे पांडुरंग माधवराव सुरोषे यांचे शेतामध्ये बांधलेली गाय आणि वळु बांधलेले होते. मेघगर्जनेसह पाऊस झाल्याने या पावसात वीज पडल्याने गोरा वय अंदजे सात महीण्याचा वळु
विज पडून ठार झाला आहे सुदैवाने गाय बचावली असल्याने पांडुरंग माधव सुरोषे यांचे पंचवीस ते तीस हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे शेतकर्यांनी सांगितले आहे महसूल प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे
यावेळी झालेल्या अवकाळी पावसाने शेतीच्या पीकांचे गहु हरभरा भाजीपाला पीकांचे नुकसान झाले असल्याने नुकसान ग्रस्त शेतकर्याला मदत मीळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.