बोरी अरब येथे कोरोना व्हायरस एकही रुग्ण आढळला नसला तरी ग्राम पंचायत बोरी तर्फे गावातील सोडियम हायपॉलक्लोराईट ची फवारणी.
News network, दारव्हा
संपूर्ण जगात कोरोणा व्हायरसने कहर केला असून भारतातही या जीवघेण्या घातक वायरस ची व्याप्ती वाढू नये यासाठी शासनातर्फे शहरापासून तर गाव खेड्यापर्यंत वेगवेगळ्या उपाययोजना करून खबरदारी घेतली जात आहे. बोरी अरब येथे कोरोना व्हायरस एकही रुग्ण आढळला नसला तरी कोरोणा चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून ग्रामपंचायत यांनी फवारणी यंत्राद्वारे सोडियम क्लोराइड ची फवारणी करून गाव निर्जंतुकिकरण करण्यास सुरुवात केली आहे..अवघ्या देश-विदेशात कोरोनाव्हायरस ने कहर केला असून याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना चालू आहे तसेच दारव्हा तालुक्यातील बोरी अरब येथे कोरोणा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी केली.
बोरी अरब आठ हजार लोकसंख्या आहे गावात सोडियम क्लोराइड सेनिटाजर, तुट्टी , डेटॉल, इत्यादी सर्व मिक्स करून फवारणी सुरुवात करताना संकट कितीही मोठे असले तरी नागरिकांनी न घाबरता प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे असे आव्हान ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे…. या वेळी
ग्राम पंचायत सरपंच ममता ताई लढ्ढा ,
तालुका कृषी अधिकारी शेखर थोरात , लाडखेड PSI तुकाराम ढोके , ASI भासकरराव धरणे, कॉन्स्टेबल उमेश चंदन ,मयुर साहेब, ग ग्राम सेवक अशोक पाटेकर , तलाठी वीर साहेब, पोलीस पाटील हरी ठाकरे, कृषी सहायक आशिष काटकर, उप सरपंच बबलू जयस्वाल ,ओम लढ्ढा, विनोद कावरे ,रणजित काकडे, शंकर चव्हाण, नरेंद्र तिवारी, हेमा ताई इलमे…
आशा वर्कर व तसेच गावातील वरिष्ठ नागरिक उपस्थित होते…