क्राईम डायरी

उमरखेड दि.२९/०२/२०२० रोजी पडताळनी कार्यवाही दरम्यान या प्रकरणातील लाचखोर अधिकारी संजय खंदाडे यांचा लाचखोर चेहरा समोर आला.

शनिवार दि.१४/०३/२०२० हा दिवस उमरखेड पोलीस विभागाची अब्रु वेशीवर टांगणारा निघाला.

ब्योरो रिपोट :-उमरखेडःपर्दाफाश

शनिवार दि.१४/०३/२०२० हा दिवस उमरखेड पोलीस विभागाची अब्रु वेशीवर टांगणारा निघाला. उमरखेडचे एसडीपीओ विकास तोटावार,ठाणेदार संजय खंदाडे ,सहाय्यक पो.नि.श्रीकांत इंगोले,रायटर पोलीस शिपाई सुभाष राठोड,एसडीओ कार्यालयाचा पोलीस शिपाई शेख मुनीर शे महेबूब अशी लाचखोरांची नावे असून त्यांना तत्काळ जेरबंद करण्यात आले.या प्रकरणातील लाचखोर एपीआय श्रीकांत इंगोले हा घटनेनंतर फरार झाला. समाजातील गुन्हेगारीवर वचकबसवण्याचे काम पोलीसांचे असते.कायदा व सुव्यस्था प्रस्थापित होण्यासाठी पोलीस दल २४ तास सेवारत असते.खरेतर याठिकाणी काम करणारा पोलीस हा सुद्धा माणूस आहे.जेव्हा कर्तव्यात पोलिसांकडून जरासुद्धा कुचराई होते,तेव्हा सारे खापर कर्तव्यदक्ष व इमानदारी जागृत ठेवणार्‍या ईतर पोलीसावर सुद्धा फुटते.त्यांच्या कार्यक्षमतेवर अविश्वास दाखवला जातो.महानगरे व जिल्ह्याचे ठिकाण वगळता शहरी भागातील पोलीस ठाणे जणू अवैद्य वसुलीचे अड्डे बनले आहेत. याचे महत्वाचे कारण म्हणजे आजकालच्या पोलीस अधिकारी वर्गाला आपल्या जबाबदारीचे सुतरामही भान राहिले नाही. अंगावर चढवलेली वर्दी व शिरपेचात घातलेली टोपी म्हणजे अवैद्य वसुलीचा परवाना मिळाल्याच्या तोरात हे पोलीस अधिकारी व त्यांचे काही शिपाई (चांगले काम करणारे वगळता) वागतांना दिसत आहेत. ‘अन्याय झाल्यास न्याय देणारा पोलीस आजकाल दिसेनासा झाला आहे’ .वरली मटका ,जुगार,अवैद्य गुटखा ,सुगंधीत तंबाखू,गांजा ,बनावट दारु,बनावट ताडी विक्री व इतर पादक पदार्थांच्या लाखो रु.अवैद्य व्यवसायाच्या कमाईत पोलीस अधिकारी व्यस्त आहेत. आजची नौकरी उद्या जाईलच म्हणून हे अधिकारी अवैद्य धंद्याच्या माध्यमातून समाजातील
युवापीठी देशोधडीला लावण्याचे काम करतांना दिसतात. एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाल्यास पोलीस त्या व्यक्तीलाच धाक दाखवत खाली बसवतात व गुन्हेगारांना,अवैद्य व्यवसायीना खुर्ची देतात.
उमरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दित येत असलेल्या सुकळी (ज.) येथील मदरशा मध्ये पोषण अहारात अफरातफर झाली होती.या प्रकणात अद्यापपर्यंत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले नव्हते.सदर दोषारोपपत्र व फायनल न्यायालयात पाठवण्यासाठी ठाणेदार संजय खंदाडे व सपोनि श्रीकांत इंगोले हे दोघेही रायटर सुभाष राठोड यांच्या मार्फत मागील तीन दिवसापासून ४०,०००/ रु.लाचेची मागणी करीत होते.
यामध्ये एसडीपीओ विकास तोटावार हे सुद्धा सहभागी असल्याची तक्रार यवतमाळ लाच लुचपत प्रतिबंध विभाग यवतमाळ यांचेकडे देण्यात आली. दि.२९/०२/२०२० रोजी पडताळनी कार्यवाही दरम्यान या प्रकरणातील लाचखोर अधिकारी संजय खंदाडे यांचा लाचखोर चेहरा समोर आला.संजय खंदाडे यांनी आपल्या कक्षात रायटर सुभाष राठोड यांच्या मार्फत लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य केले. तसेच सपोनि श्रीकांत इंगोले यांनी एसडीपीओ तोटावार यांना काही रक्कम देऊन गप्प बसवण्याची भूमिका दर्शविली.पोलीस शिपाई शेख मुनीर शेख महेबूब यांनीही तक्रारदाराकडे पैस्याची मागणी लाऊन धरली होती.एसडीपीओ विकास तोटावार,ठाणेदार संजय खंदाडे,पो.शि.सुभाष राठोड पो.शि.शेख मुनीर शेख महेबूब यांना पुसद येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते.या चौघांना २७ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.फरार एपीआय
श्रीकांत इंगोले हा दुपारपर्यंत फरारच होता. या कारवाई दरम्यान विश्राम गृहामध्ये अवैद्य व्यसायीक,राजकारणी नेते,
पोलीस अधिकारी ,शिपाई ,पत्रकार यांची गर्दी जमली होती.
गुन्ह्यामध्ये अडकलेले विकास तोटावार ,ठाणेदार खंदाडे,सुभाष राठोड ,शेख मुनीर शेख महेबूब यांचे परिवारातील सदस्य व नातलग हजर होते. अंगावर वर्दी चढऊन ‘वाघ डरकाळ्या’ फोडणारे अधिकारी शर्मेने खाली मान घालून दुःखाश्रूनां वाट मोकळी करुन देत होते, या तपासामध्ये श्रीकांत धिवरे पो.अ. अॅन्टी करप्शन ब्युरो,अपोअ डोंगरदिवे,पोउअ राजेश मुळे यांचे मार्गदर्शनात पो.नि.हर्षराज अळसपुरे,निवृत्ती बोर्‍हाडे, अमोल इंगोले वाशिम व पोलीस कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.

प्रतिनिधी :- इरफान शेख ढाणकी

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *