रेल्वे वेळापत्रका नुसार चालतात शाळा,विद्यार्थांची मात्र गैर सोय,अधिकार्यांचे दुर्लक्ष जिल्हा परिषद हायस्कूल मोमीन पूरा येथील प्रकार
( हिमायतनगर )शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल मोमीन पूरा या शाळेतील शिक्षकांचा कारभार रेल्वे वेळापत्रका नुसार चालतो या शाळेतील चिमुकल्या विद्यार्थाना सकाळी 9 वाजले तरी शाळेच्या गेट जवळ शिक्षकांची वाट पाहत बसावे लागत असल्या मुळे येथील संत्रप्त पालकांनी संताप व्यक्त केला आहे
या बाबत सविस्तर व्रत असे ही सदया हिमायतनगर तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी हे पद रिक्त असल्यामुळे शहरासह तालुक्याच्या शाळांची पण हिच परिस्थिति आहे असंख्य ठिकांनच्या जिल्हा परिषद् शाळा हे रेल्वे वेळापत्रका नुसार चालतात असा प्रकार शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल मोमीन पूरा येथील शाळेत दि 11 फेब्रुवारी रोज सोमवारी घडला आहे चक्क सकाळचे 9 वाजले तरी ह्या शाळेतील एकही शिक्षक शाळेत हजर झाले नाही त्यामुळे या शाळेतिल असंख्य चुमकले विद्यार्थी शिक्षकांची वाट पाहत शाळेच्या गेटजवळ रोड वर उभे राहत होते हा प्रकार येथील पालक वर्गाना कळताच त्यांनी सबंधित शिक्षकांशी संपर्क केला असता असे कळले की सर्व शिक्षक हे रेल्वेने शाळेस ये-जा करतात त्यामुळे येथील जि.प.हायस्कूल शाळा ही वेळेवर काधिच भरत नसल्याचा आरोप उपस्थित पालकांनी आमच्या प्रतिनिधिशि बोलताना सांगितले त्या मुळेया बाबी कडे तात्काळ पंचयात समिति सभापती व प्रभारी गटशिक्षण अधिकारी यांनी लक्ष देऊन येथील विद्यार्थांना होणार त्रास दूर करावा अशी मागणी उपस्थित शाळा व्यवस्थापन समिति अध्यक्ष सय्यद नयूम,सय्यद अलीम,मोहम्मद जमीन,सलाम खुरेशि,अब्दुल हाफिज,खालिद मतीन सह पालकांनी केलि आहे
<<प्रतिनिधी :- शेख चांद शेख तैयब >>