दारव्हा ते आर्णी रोड रस्ता बनला अपघाताचे प्रवणस्थळ
दारव्हा ते आर्णी रोड रस्त्याचे काम करणाऱ्या ईगल कंपनीवर कारवाई करा.
जिल्हाधिकारी यवतमाळ व सार्वजनिक बांधकाम उपविभाग दारव्हा यांना बहुजन मुक्ती पार्टीची मागणी.
दारव्हा (प्रतिनिधी):- मागील वर्षी पासून दारव्हा ते आर्णी रोड रस्त्याचे काम सुरु आहे.परंतु ज्या ठिकाणी रोड रस्त्याचे काम आहे त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅरीगेट लावणे किंवा रेडीयमच्या पट्ट्या लावणे अत्यंत गरजेच्या असतात परंतु ज्या ईगल कंपनीच्या माध्यमातून रस्त्याचे बांधकाम सुरु आहे त्यांनी मात्र काम सुरु असतांना रस्त्यावर अपघात होवू नये यासाठी कोणतीही काळजी घेतलेली दिसून येत नाही.यामधून कंपनीचा निष्काळजीपणा स्पष्ट दिसून येत आहे.त्यामुळे दि. 3 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री 2:30 ते 2:45 वाजता ट्रक वाहन क्रमांक MH20.EG9537 आर्णी ते दारव्हा येत असतांना महागांव ते धनगरवाडी या गावाच्या मधात रस्त्याचे काम सुरु असलेल्या ठिकाणी रस्त्यात सूचना फलक व बॅरीगेट न लावल्यामुळे पाऊस सुरु असल्यामुळे ट्रक मध्य भागातून घेण्यासाठी रस्त्यावरून जातांना पुढील केलेले खोदकाम न दिसल्यामुळे ट्रक सरळ खोदकाम केलेल्या खड्ड्यात पडला त्यामुळे ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ड्रायव्हर सुद्धा सुदैवाने बाल बाल बचावला आहे.परंतु असे अपघात पुढे सुद्धा मोठ्या प्रमाणात होवू शकतात.याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे सदर रोड रस्त्याचे काम करणाऱ्या ईगल कंपनीवर जिल्हाधिकारी यवतमाळ व सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य ती कारवाई करण्यात यावी.तसेच ट्रक चालकाचे झालेली नुकसान भरपाई कंपनी ने द्यावी.यापुढे दारव्हा ते आर्णी रोड रस्त्याच्या कामामुळे अपघात झाल्यास सरळ कंपनी वर गुन्हे करण्यात यावे.अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने बिमोद मुधाने बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा अध्यक्ष यवतमाळ/वाशीम यांच्यासह सुनील गवई जिल्हा अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा यांच्या वतीने करण्यात आली आहे.




