ताज्या घडामोडी

प्रा.ज्योती काळबांडे यांना व्हिएतनामध्ये आंतरराष्ट्रीय बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान.

प्रा.ज्योती काळबांडे यांना व्हिएतनामध्ये आंतरराष्ट्रीय बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान.

 

उमरखेड / मिलिंद चिकाटे :- परिसरातील मिलिंद महाविद्यालय मुळावा येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा . ज्योती काळबांडे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक , शैक्षणिक कार्याबद्दल आंतरराष्ट्रीय बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला . येथील अ – 25 लक्झरी हॉटेलात आयोजित भव्य सभागृहात जागतीक आंबेडकरी साहित्य महामंडळाच्या वतीने आयोजीत सहाव्या विश्व आंबेडकरी साहित्य संमेलनात अध्यक्ष सुप्रसिद्ध नाटककार डॉ . सुनील रामटेके संमेलनाचे उद्घाटक जेष्ठ कथाकार प्राचार्य डॉ नागनाथ पाटील,स्वागताध्यक्ष जागतिक समाजशास्त्रज्ञ डॉ . जगन कराडे,महामंडळाचे अध्यक्ष प्रा. दीपककुमार खोब्रागडे , संस्थेचे उपाध्यक्ष तथा संमेलनाचे संयोजक प्रोफेसर डॉ . अनिल काळबांडे , प्राचार्य डॉ . राहुल मस्के , डॉ . राजेश गायकवाड , प्राचार्य डॉ . वैशाली प्रधान, महामंडळाचे कायदेविषय सल्लागार एडवोकेट भूपेश पाटील , डॉ गुरुस्वामी,यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह , प्रमाणपत्र देऊन हा पुरस्कार देण्यात आला . प्रा . ज्योती काळबांडे गेल्या 30 वर्षापासून मिलिंद महाविद्यालयात राज्यशास्त्र विषयाचे अध्यापन करतात त्याचबरोबर त्या विविध सामाजिक संघटनेत व शैक्षणिक कार्यात महत्वपूर्ण योगदान देतात त्यांच्या शैक्षणिक कार्यातून अनेक युवक युवतींना समोर जाण्याची प्रेरणा मिळते .त्यांच्यात सामाजिक जाणीव निर्माण होते . विद्यार्थ्यांना अनेक उपक्रमातून त्या सातत्याने प्रयन्त करत असल्याने त्या विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून सुद्धा प्रसिद्धआहेत . डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आधारित महापुरुषांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन सामाजिक वंचित घटकांना न्याय देण्याकरिता हा जागतिक पातळीवरचा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या वतीने याही अगोदर दुबई , बँकॉक, थायलंड ,मलेशिया श्रीलंका या देशात संमेलने घेऊन सामाजिक कार्य करणाऱ्यांचा यथोचित गौरव करण्यात आला होता . प्रा . ज्योती काळबांडे यांच्या यशामुळे उमरखेड तथा जिल्ह्यात साठी ही अभिमानाची बाब असल्याने त्यांचे अनेक सामाजिक शैक्षणीक तथा पत्रकार वतीने अभिनंदन करण्यात आले .

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *