उमरखेड तालुक्यातील घमापूर येथील पेपर विक्रेत्यांनीघडविले दोन सर्जन डॉक्टर
उमरखेड तालुका प्रतिनिधी
मिलिंद चिकाटे
उमरखेड तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसाहत असलेल्या घमापूर येथील नंदकिशोर जाधव यांनी दैनिक पुण्यनगरी या वृत्तपत्रांचे सतत दहा वर्षापासून पेपर एजन्सी वर आपल्या कुटुंबातील लहाने बंधू डॉक्टर विठ्ठल काशीराम जाधव यांना पहिली ते चौथी शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घमापूर पाचवी ते सहावी शिक्षण वसंतराव नाईक महाविद्यालय कृष्णा वाडी बाराळी सातवी ते दहावीपर्यंत आदर्श विद्यालय नांदेड तर दहावी ते बारावी हे शिक्षण संत गाडगेबाबा विजा भज आश्रम शाळा महाविद्यालय ढाणकी येथे शिक्षण झाला असून त्यांनी नीट हे परीक्षा नांदेड येथे नामांक असलेल्या राठोड कोचिंग क्लासेस यामध्ये चांगले मार्क मिळवून त्यांनी बी एम एस डिग्री नागपूर येथील एस के आर पांडव कॉलेज मध्ये बी एम एस डिग्री हसीन केली त्यात अनुसंगांनी त्यांनी पीजी हे एक्झाम देऊन प्रथम वर्षी उत्तीर्ण होऊन त्यांचा अश्विन रुरल आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल मंचिरलची मंची हिल संगमनेर येथे सर्जरी म्हणून त्यांचा शिक्षण चालू असून त्यांचे पुतणे डॉक्टर गोपाल नंदकिशोर जाधव यांनी जिल्हा परिषद शाळा घमा पूर येथे एक ते चार वर्ग शिक्षण घेतले असून तिसरी ते दहावीपर्यंत शिक्षण आदर्श विद्यालय टिळक नगर नांदेड येथे शिक्षण घेतले अकरावी ते बारावी संत गाडगेबाबा आश्रम शाळा महाविद्यालय धानकी येथे त्यांचा शिक्षण घेण्यात आले असून त्यामध्ये नीट हे परीक्षा नांदेड येथील प्राध्यापक कैलास राठोड क्लासेस मध्ये चांगले गुण घेऊन त्यांनी डॉक्टर फिजिओथेरपी प्यारालीसीस डॉक्टर म्हणून पदवी अपरंपार स्वामी फिजिओथेरपी कॉलेज नांदेड येथे डिग्री मिळवली त्यामध्ये एम यु एच एस नाशिक या बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झाली या कठीण परिस्थितीला मात देऊन नंदकिशोर जाधव व त्यांचे बंधू शंकर जाधव यांनी दोन्ही भाऊ व पुतण्यांना कठोर परिश्रम घेऊन पाच वर्षाच्या कालखंडामध्ये चांगले गुण मिळविण्यासाठी श्रेय दिले या अनुसंगाने दोन्ही मुलांनी गमापुर येथील नाव आज रोजी उमरखेड तालुक्यात रोशन केला या अनुषंगाने नागपूर येथे विठ्ठल जाधव यांचा डिग्री देऊन सत्कार तर नांदेड येथे डॉक्टर गोपाल यांचा सत्कार व डिग्री देण्यात आली यामध्ये ग्रामीण भागात राहून गरीब परिस्थितीतून परिस्थितीला मात करून गरीब व्यक्तींनी आजपर्यंत या घामापुर येथील असून प्रथम डिग्री डॉक्टरची या दोन व्यक्तींनी मिळविल्याबद्दल त्यांच्या आई-वडिलांचे कौतुकस्पद होत असून यात शिक्षणापासून तर डिग्रीपर्यंत त्यांचे मोठे बंधू शंकर काशीराम जाधव यांचे शेअर श्रेय असून त्यांच्या आई व वहिनी सविता नंदकिशोर जाधव तसेच सौ विशाखा शंकर जाधव माझी उपसभापती पंचायत समिती उमरखेड यांनी या दोन्ही मुलांचे जीवन घडविण्याचे श्रेय घेतले म्हणून त्यांनी त्यांचे कार्य पार पडले या कौतुकास आज रोजी बंदी भागात त्यांचे श्रेय दुसऱ्या विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा अशी चर्चा परिसरात चालू असून आज रोजी या दोन्ही डॉक्टर मुळे बऱ्याच कुटुंबाचा उदरनिर्वाह व सुखदुःखामध्ये सहभाग होण्याचे संकेत उद्भवले आहेत त्यातच डॉक्टर गोपाल यांचे वडील आज रोजी दैनिक पुण्यनगरी या वृत्तपत्राचे प्रतिनिधी असून यांनी वृत्तपत्र विकून आज आपल्या भावांना व मोठ्या मुलांना शिक्षण देत असून त्यांचे लहाने मुलगा आज रोजी जयपाल जाधव यांचा पुणे येथील गव्हर्मेंट कॉलेजमध्ये शिक्षण पुणे येथे बीबीए म्हणून त्यांचे शिक्षण चालू असून त्यांच्या कुटुंबात आनंद होत आहे परिश्रम घेऊन त्यांचा संसार आज रोजी थाटामाटाने चालू असल्याचे कौतुक जनतेत होत आहेत




