ताज्या घडामोडी

ढाणकी महावितरण कार्यालयावर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची धडक….

ढाणकी महावितरण कार्यालयावर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची धडक….

 

ढाणकी ( प्रतिनिधी ) मिलिंद चिकाटे

येथील महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यांचा मनमानी कारभार, स्मार्ट मीटरची सक्ती आणि विस्कळीत वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी व पदाधिकाऱ्यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. उपकार्यकारी अभियंता जाधव यांना निवेदन देऊन संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.ढाणकी शहरात गेल्या काही दिवसांपासून महावितरणच्या कारभाराबाबत कमालीची नाराजी आहे. सहाय्यक अभियंता राहुल नाखले हे मुख्यालयी उपस्थित राहत नसल्याने ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण होत नाही. महत्त्वाचे म्हणजे, शहराचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेवर परिणाम झाला असून शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्राहकांना विविध आमिषे दाखवून स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. नागरिकांचा याला तीव्र विरोध असून ही प्रक्रिया थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे.वीज पुरवठ्याबाबत विचारणा करण्यास गेलेल्या ग्राहकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. सहाय्यक अभियंता कर्तव्यावर हजर राहत नसल्याने जनतेची कामे रखडली आहेत.​”सहाय्यक अभियंता आपल्या कर्तव्यात कसूर करत असतानाही वरिष्ठ त्यांना पाठीशी घालत आहेत. जर वीज पुरवठा सुरळीत झाला नाही आणि स्मार्ट मीटरची सक्ती थांबली नाही, तर नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा सर्व पदाधिकाऱ्यांनी दिला निवेदन देते वेळी काँग्रेसचे बाळू पाटील चंद्रे, मनसेचे सादिक शेख, अमोल तुपेकर,खाज्या भाई कुरेशी,शिवसेनेचे सूर्यकांत वासमवार,फिरोज भाई बंटी वाळके, संभाजी गोरठकर, आझाद पार्टीचे प्रशांत विनकरे, शेख जब्बार, राकॉचे संतोष मनतेवाड, सचिन तोटेवाड, शिंदे गट चे संजय सलेवाड, शेख mim चे बशीर, शेख एजास यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

चौकट

वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना कुठलीही सूचना न देता सहाय्यक अभियंता नाखले यांनी ढाणकी शहरा मध्ये विद्युत मीटर कनेक्शन कट करण्याचा व वसुलीच्या नावाखाली स्मार्ट मीटर बसवण्याचा सपाटा लावला आहे सहाय्यक अभियंता अश्या बेजबादार अधिकाऱ्यावर वरीष्टांनी लावक रात लवकर कार्यवाही करावी अन्यथा मनसे आपल्या परीने अश्या अधिकाऱ्यांना धडा शिकवेल

सादिक शेख

तालुका अध्यक्ष मनसे

वीज कायदा 2003 नुसार ग्राहकांना वीज मीटर निवळीचे स्वतंत्र अधिकार आहे ग्राहकांच्या स्मार्ट मीटर बसवता येणार नाही

जॉन्टी विनकरे जिल्हाध्यक्ष आझाद समाज पार्टी

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *