आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन यंदा व्हिएतनामल.
उमरखेड / प्रतिनिधी मिलिंद चिकाटे :-जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळातर्फे सहा वे आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन व्हिएतनाम ची राजधानी होनई येथे 15 मार्च ते 24 मार्च दरम्यान मोठ्या प्रमाणात संपन्न होत आहे . या विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध नाटककार डॉ . सुनील रामटेके तर उद्घाटक म्हणून होनई विद्यापीठाचे भाषाशास्त्र प्रमुख डॉ . ली . व्हान . चॅग यांच्या हस्ते होणारा असून स्वागत अध्यक्षपदी समाजशात्रज्ञ
डॉ. जगन कराडे , कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महामंडळाचे अध्यक्ष डॉ . दीपककुमार खोब्रागडे सह देश विदेशातील मान्यवर उपस्थित राहणार असून या साहित्य संमेलनात यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास 15 जणांचा सहभाग असून त्यात जिल्ह्यातील सहा साहित्यिकांचा सहभाग परिसंवाद , कवी संमेलनासह विशेष अतिथी राहणारआहेत . यापूर्वीही आंबेडकरी विश्व साहित्य संमेलन बँकॉक,थायलंड , दुबई ,श्रीलंका , मलेशिया या देशात आयोजित केले होते . या विश्व साहित्य संमेलनात उमरखेड येथील प्रख्यात साहित्यिक, मिलिंद महाविघालय मुळावा चे मराठी विभाग प्रमुख तथा विश्व कवी संमेलनाचे अध्यक्ष प्रोफेसर डॉ . अनिल काळबांडे , ‘वेगळे जग ‘ या प्रवास वर्णनाच्या लेखिका तथा मिलिंद महाविघालय मुळावा च्या राज्यशास्त्र विभाग प्रमुख,प्रा . ज्योती खंदारे ,कवियत्री शिला कदम यांच्या ‘हृदयाची स्पंदने ‘ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ही या संमेलनात होणार आहेत . मुख्याध्यापक सुरेश कदम , मुख्याध्यापक बाळासाहेब सरसमकर ,पुसद येथील पी . एन . कॉलेजच्या लेखिका डॉ . अनिता कांबळे ज्येष्ठ विचारवंत प्रा . डॉ . प्रदीप इंगोले प्रा . अशोक तिवारी प्रा . आनंद वाघमारे यासह इतर मान्यवर सहभागी होणार आहेत . या साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा ,परिसंवाद, पुरस्कार वितरण,कवी संमेलन,ग्रंथ प्रकाशन सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रमा सह समारोप मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून महाराष्ट्र ,दिल्लीसह जवळपास 500 प्रतिनिधी या संमेलनात सहभागी होणार असल्याची माहिती जागतिक आंबेडकरवादी महामंडळाचे अध्यक्ष प्रा. दीपककुमार खोब्रागडे,उपाध्यक्ष प्रा. डॉ . अनिल काळबांडे यासह कायदेविषयक सल्लागार एडवोकेट भूपेश पाटील यांनी दिली आहे . या विश्व आंबेडकरी साहित्य संमेलनात कुठल्याही प्रकारचे अनुदान शासन वा कुणाकडूनही घेतले जात नाही साहित्यिक आपल्या स्व खर्चाने हे संमेलन यशस्वी करतात . यवतमाळ जिल्ह्यातील साहित्यिक आपल्या मराठी साहित्याच्या माध्यमातून आंबेडकरी विचार साता समुद्रापार पोहचविण्यासाठी सहभागी झाले आहेत . सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .





