ताज्या घडामोडी

उमरखेड : करंजीची सुवर्णकन्या निकिता देवकते अमरावती येथे सुवर्णपदकाने सन्मानित. 

उमरखेड : करंजीची सुवर्णकन्या निकिता देवकते अमरावती येथे सुवर्णपदकाने सन्मानित.

ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकटे

23 फेब्रुवारी 2026 रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 42 वा दीक्षांत समारंभ मोठ्या थाटामाटात विद्यापीठाच्या परिसरात पार पडला या सोहळ्यात उमरखेड येथील गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालयाची विद्यार्थिनी निकिता देवकते ला सुवर्णपदक देऊन विद्यापीठाने गौरविले.

ग्रामीण भागात शैक्षणिक सेवा सुविधांचा अभाव असला तरी जर विद्यार्थ्यांमध्ये जिद्द चिकाटी आणि अथक मेहनत करण्याची तयारी आणि पालकांचे मुला-मुलींना खंबीर पाठबळ असेल तर आभाळाला ही गवसणी घालता येते.

गावंडे महाविद्यालयाची विद्यार्थीन करंजीची सुवर्णकन्या निकिता पुणेश्वर देवकते हिने 23 फेब्रुवारी 2026 रोजी सिद्ध केले आहे.सन 2024 25 या शैक्षणिक वर्षात बीए तृतीय वर्षामध्ये स्नातक मराठी वांग्मयात स्व. श्रीमती सरस्वतीबाई आनंदराव राऊत सुवर्णपदक, श्री विनायकराव शंकरराव हुड रोप्यपदक, श्री भालचंद्र दामोदर बापट रोख पारितोषिक आणि श्रीमती यमुनाबाई गोडबोले रोख पारितोषिक स्नातक मराठी वांगमय परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदकाची व पारितोषिकाची मानकरी ठरणारी निकिताने आपल्या ध्येयाचे क्षितिज गाठण्यासाठी उंच भरारी घेतली आणि आपल्या महाविद्यालया सोबत ज्या मातीत तिची जडणघडण झाली त्या करंजी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

या ऐतिहासिक कामगिरीबद्दल तिच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनचा वर्षाव सुरू आहे निकिता देवकते ही उमरखेड तालुक्यातील यवतमाळ जिल्ह्यातील बंदी भागातील छोट्याशा करंजी गावावरून दररोज 25 किलोमीटर अंतर महामंडळाच्या बसने प्रवास करावा लागत असे घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे अभ्यासासाठी कोणत्याच सोयीसुविधा नाहीत.

निकिता सध्या अमरावती येथे पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकत आहे लहान बहीण स्नेहा गडचिरोली जिल्ह्यात पोस्ट खात्यात नोकरी करत आहे तर भाऊ गणेश बीए प्रथम वर्षात शिकत आहे निकिताने प्रतिकूल परिस्थितीच सामना करत आपल्या देवकते कुटुंबाचा व करंजी गावचा नवलौकिक वाढविला आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *