ताज्या घडामोडी

उमरखेड : दिव्यांग विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत ढाणकीच्या विद्यार्थ्यांचे सुयश.

उमरखेड : दिव्यांग विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत ढाणकीच्या विद्यार्थ्यांचे सुयश.

 

ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकटे

दि.3 व 4 फेब्रुवारी ला यवतमाळ येथे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय यवतमाळ द्वारा आयोजित दिव्यांग विद्यार्थ्याचे जिल्हा क्रीडा स्पर्धा व संस्कृतीक कार्यक्रम पार पडल्या सदर स्पर्धेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की साहेब व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी श्रीमती मंगला मून मॅडम यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

सदर स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील सर्वच प्रवर्गातील दिव्यांग शाळेने सहभाग घेतला होता.

सर्वच शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वयोगटात वेगवेगळ्या खेळाच्या प्रकारात यश संपादन केले असून ढाणकी येथील.स्व.थावराजी नाईक निवासी दिव्यांग विद्यालय ढाणकी येथील विद्यार्थिनी कु. जयश्री पंजाब मेंडके हिने वयोगट 8 ते 12 मध्ये 50 मीटर धावणे मध्ये जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.तर 25 मिटर कुबडी धावणे मध्ये कु. स्वरांजली गणेश जाधव हिने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.

सोबतच. मधुकरराव नाईक निवासी मुकबधिर विद्यालय ढाणकी या विद्यालयातील विद्यार्थी शिवम दिलीप मडावी याने.16 ते 21 या वयोगटात 400 मीटर धावणे मध्ये प्रथम क्रमांक पाठविले आहे.तर. पवन पंडित पावडे याने 12 ते 16 वयोगटात गोळा फेक मध्ये द्वितीय क्रमांक पाठविला आहे.कु. नंदिनी सुदर्शन आडे या विद्यार्थिनीने 16 ते 21 या वयोगटात 400 मीटर धावणे मध्ये द्वितीय क्रमांक फटकावले आहे.

सर्व विजेत्या खेळाडूंचे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी श्रीमती मंगला मून मॅडम यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात असून .विद्यार्थ्यांच्या या सुमार कामगिरीबद्दल स्व.चांदीबाई शिक्षण संस्थेचे मानद सचिव मा.श्री.एस.एन.पवार साहेब . अध्यक्ष सौ.जनाबाई शेषराव पवार .सदस्य श्री.सुदर्शन भाऊ पवार विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.भोने सर यांनी कौतुक केले असून राज्यस्तरीय साठी शुभेच्छा दिल्या आहे . विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय विद्यालयातील शिक्षक.श्री.शंकर चव्हाण. श्री.आडे सर. श्री.काळे सर. श्री.पाटील सर. श्री.रावते सर श्री डि.एन..जटाळे व श्री एन डी.आडे यांना दिले आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *