सर्वसमावेशक कार्यकारिणीवर शिक्कामोर्तब; शहराच्या विकासाला मिळणार प्रशासकीय गती
ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकटे
ढाणकी नगरपंचायतमध्ये सन २०२६ या वर्षासाठी विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. या निवडीनंतर नगरपंचायतची अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘स्थायी समिती’ गठीत करण्यात आली असून, यामध्ये अनुभवी आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. या नव्या कार्यकारिणीमुळे शहराच्या प्रलंबित विकासकामांना आता मोठी गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नगरपंचायतच्या नियमानुसार नगराध्यक्षा या स्थायी समितीच्या पदसिद्ध सभापती असतात. त्यानुसार नूतन समिती खालीलप्रमाणे गठीत झाली:
सभापती: सौ. अर्चना सुंदरकांता वासमवार (नगराध्यक्षा)
सदस्य: श्री. दत्तदिगांबर श्रीकृष्ण वानखेडे (उपनगराध्यक्ष), .शायदाबी शेख मिरांजी, यास्मीन अख्तर मुनव्वर , सौ. दुर्गा साईनाथ मंतेवाड.
विविध विभागांच्या माध्यमातून शहराचा विकास साधण्यासाठी सभापतींची निवड करण्यात आली आहे:सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी शायदाबी शेख मिरांजी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य सभापतीपदी उपनगराध्यक्ष श्री. दत्तदिगांबर श्रीकृष्ण वानखेडे सांभाळतील.पाणी पुरवठा व जलनिस्सारण सभापतीपदी . यास्मीन अख्तर मुनव्वर यांची वर्णी लागली आहे.महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सौ. दुर्गा साईनाथ मंतेवाड तर उपसभापतीपदी नफीसाबी इम्रान शेख यांची निवड झाली आहे.
समिती गठीत करतेवेळी नगरसेवक प्रफुल चौरे, उमेश योगेवार, मल्हार चंद्रे, देव निमलवाड, रविशंकर ढोबळे, नागेश रातोळे, सौ. सारिका विनोद कांबळे, बीबी हाजरा शेख एजाज, रोहिणी गोटलेवाड, शेख फरजानाबी शादुल उपस्थित होते. तसेच मार्गदर्शक म्हणून स्वीकृत नगरसेवक रोहित वर्मा व संजय सलेवाड यांच्यासह नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुराडे यांची प्रमुख उपस्थिती निवड पार करण्यात आली या निवडीनंतर नवनियुक्त सभापतींचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे




