ताज्या घडामोडी

आत्महत्याग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शासनाने तत्काळ लाभ द्यावा अन्यथा तालुक्यात बैलगाडी मोर्चा काढू.- विद्वानभाऊ केवटे.

आत्महत्याग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शासनाने तत्काळ लाभ द्यावा अन्यथा तालुक्यात बैलगाडी मोर्चा काढू.- विद्वानभाऊ केवटे.

 

उमरखेड तालुका प्रतिनिधी:- मिलिंद चिकाटे.

 

उमरखेड तालुक्यात ऑगस्ट महिन्याच्या झालेल्या पावसामुळे अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे.

 

यासंदर्भात “शासनाने पूरग्रस्त परिस्थितीमुळे नुकसानग्रस्त शेतीचे कोणत्याही प्रकारचे सर्वे न करता विशेषतः नुकसानग्रस्त,आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना तत्काळ लाभ द्यावा.अन्यथा तालुकास्तरी बैलगाडी मोर्चा काढू.”असा इशारा भारत मुक्ती मोर्चा चे विद्वाभाऊ केवटे यांनी दिला.

 

पूरग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यांतर्गत त्यांनी उमरखेड तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन पूरग्रस्तांच्या शेतीच्या बांधावर आणि प्रत्यक्ष घरो घरी जाऊन व्यथा जाणून घेतल्या.

यादरम्यान टेंभुरदरा या गावी 100% नुकसान झालेल्या सीमा भिकू जाधव या विधवा महिला शेतकऱ्यांचे शेतात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.आणि कुटुंबीयांचे सांत्वन केले.

 

 

यावेळी विद्वान केवटे यांच्या नेतृत्वातील प्रतिनिधी मंडळामध्ये मिलिंद चिकाटे, कृष्णा पाटील चंद्रवंशी,बाजीराव गायकवाड,दिलीप कलाले, इंदल राठोड,मुनव्वर खान,संतोष पाटील यांसह गावातील पूरग्रस्त नुकसान ग्रस्त शेतकरी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *