उ.बा.ठा.शिवसेना जिल्हाप्रमुख मा.ज्योतिबादादा खराटे यांच्या वाढदिवसाची नियोजन बैठक संपन्न
नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर
दी.25 रोजी शिवसेना कार्यालय माहूर येथे,मा ज्योतिबा दादा खराटे यांच्या येत्या सात सप्टेंबर रोजी वाढदिवस असल्याने कार्यकर्त्यांनी नियोजन बैठक घेतली सदरील
बैठकीमध्ये किनवट माहूर तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तथा शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते.यावेळी लाडके नेते मा.ज्योतिबा दादा खराटे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असा रक्तदान शिबिर घेण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे.या जीवनदाई उपक्रमातून अनेक शिवसैनिक मोठ्या उत्साहाने रक्तदान करणार आहे याचा लाभ अनेक गोरगरीब तथा गरजू रुग्णांना होणार आहे यासाठी यवतमाळ, नांदेड़ ,आणी आदिलाबाद येथील शासकीय ब्लड बैंकेला आमंत्रित करनार असल्याचे या बैठकीचे प्रमुख पाहुणे तथा युवा सेना जिल्हाप्रमुख यश भाऊ खराटे यांनी सांगितले .तर शिवसेना तालुका प्रमुख जीतू भाऊ चोले यानी शिवसेना हा पक्ष 80% 80 टक्के समाजकारण आणि 20% टक्के राजकारण करणारा एकमेव पक्ष असल्याचे सांगितले .तसेच विधानसभा प्रमुख अनिल रनवाल ,शिवसेना शहर प्रमुख बालाजी वाघमारे यानी सुधा आपले मनोगत व्यक्त करूंन उपस्थित शिव सैनिक, युवा सैनिक, कार्यकरते तथा पदाधिकारी याना मोलाचे मार्गदर्शन केले.
तद्नन्तर उपस्थित शिवसैनिकांनी मोठ्या जल्लोषात जय भवानी जय शिवाजी चे नारे दिले,सरतेशेवटी संपूर्ण शिवसैनिक युवा सैनिक पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे अल्पोहाराचा मनसोक्त आस्वाद घेतला .



