बिटरगाव पोलीस स्टेशन तर्फे ढाणकी येथे इफ्तार पार्टीचे आयोजन.
ढाणकी प्रतिनिधी:- मिलिंद चिकाटे जातीय व सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी रमजान निमित्य ढाणकी येथील जामा मज्जिदच्या परिसरात बिटरगाव पोलीस स्टेशन तर्फे इफ्तार पार्टी व शांतता कमिटीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. कुठल्याही अफवाला अपप्रचाराला बळी न पडता सर्वांनी आपले सण उत्सव आनंदाने व शांततेत पार पाडावे असे आव्हान बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत यांनी यावेळी केले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब पाटील चंद्रे, पंचायत समितीचे माजी सभापती खाजा कुरेशी, माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष जहीर जमीनदार, काँग्रेसचे शहराध्यक्ष अमोल तुपेकर, शिवसेनेचे शहराध्यक्ष बंटी जाधव, माजी उपसरपंच इमाम ठेकेदार अजिस खा पठाण, सय्यद आबिद सर, अब्दुल जब्बार, मुनवर खान यांनी रमजान सणाचे महत्त्व विशद केले त्यानंतर बिटरगाव पोलीस स्टेशन तर्फे पोलीस कर्मचाऱ्यांकडून मुस्लिम बांधवांना फळांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार नागेश महाजन यांनी केले तर आभार पोलीस उपनिरीक्षक शिवाजी टीपूर्णे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.




