ताज्या घडामोडी

ढाणकी पोलीस चौकीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बैठक संपन्न.

ढाणकी पोलीस चौकीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बैठक संपन्न.

​डीजे ऐवजी पारंपरिक वाद्यांनी जयंती साजरी करण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन

 

​ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकटे

 

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी ढाणकी पोलीस चौकी येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत जयंती उत्सव शांततेत आणि नियमांचे पालन करून साजरा करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.सभेच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष रामराव गायकवाड, माजी पंचायत समिती सदस्य रमेश गायकवाड, माजी सभापती संबोधी गायकवाड आणि प्रशांत विनकरे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी परिसरातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित युवकांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, गावागावात जयंती साजरी होत असल्याने पारंपरिक वाद्ये उपलब्ध होण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे उत्सवासाठी ‘डीजे’ लावण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी मंडळाच्या वतीने करण्यात आली.

 

युवकांच्या मागणीला उत्तर देताना पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमवार यांनी प्रशासकीय भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की:​बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमध्ये डीजे वापरास सक्त बंदी घालण्यात आली आहे.कोणत्याही सण किंवा उत्सवासाठी डीजेला परवानगी दिली जाणार नाही.​नागरिकांनी आणि मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करून उत्साहात जयंती साजरी करावी.​उत्सवाच्या काळात कोणीही कायदा व सुव्यवस्था मोडण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन चाटे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रवीण जाधव यांनी मानले. जयंती उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *