सततच्या अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजाराचि मदत द्या…?
ओला दुशकाळ जाहिर करुण,सदरील मदत थेट शेतकऱ्यांच्या सातबारयास संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा करा… !
माहुर/नांदेड़ जिल्हा प्रतिनिधि :- गणेश राठोड़,शेकापुर
मनसे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी…!
जिल्ह्यात दिनांक 14 ऑगस्ट रोजी च्या मध्यरात्रीपासून तर आज तागायत पावसाचा जोर जिल्ह्यातील 16 तालुक्यांमध्ये कायम असल्याकारणाने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री महोदयांना ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट हेक्टरी 50.000 (पन्नास हजार) रुपये थेट शेतकऱ्यांच्या
सातबाऱ्यास संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यासंदर्भात निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. अतिवृष्टीची नोंद झाल्याचे जिल्हाधिकारी महोदय यांनी जिल्हा माहिती व प्रसारण च्या माध्यमातून चित्रफिताद्वारे अतिवृष्टीचे नोंदविण्यात आलेले सार्वजनिक केले असून शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, जिल्ह्यात अनेक ठिकाणी पुरामध्ये पाळीव प्रान्यासह पुरुष, बालक,महिलां मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे. मृत व्यक्तीच्या कुटूम्बियाना प्रत्येकी 10.00000 (दहा लाख रुपये ) आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच मानवी वस्ती मध्ये पुराचे पाणी घुसल्यामुळे राहत्या घरातील अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंची नुकसान झालि आहे . तसेच घरांची पडझड गाई गोठे, पशुधनाची जीवित हानी मोठ्या प्रमानात झाली आहे. जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना तालुक्यामधील महसुली मंडळ निहाय तलाठी,कृषी सहाय्यक, ग्रामसेवकास यांचे संयुक्त पंचनामे तात्काळ करण्याकरिता आदेशित करावे. पीक नुकसानी सह इतर सर्व नुकसान भरपाई देण्यात याव्यात. विना विलंब सरसकट शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करून शेतकऱ्यांना वर्षा काठीचे आपल्या शेतातून मिळणारी आर्थिक मिळकत शेतातील पिके वाहून गेल्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे वर्षाकाठीचे वैद्यकीय तसेच मुला व मुलींचे शैक्षणिक खर्च भागवायचं तरी कुठून या आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याशिवाय शेतकरयाकड़े पर्याय उरला नसल्यामुळे सरकारने सर्व नुकसानीचे भरीव आर्थिक मदत देऊन शेतकऱ्यांना मानसिक आधार द्यावा. जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या होऊ नये. नुकसानीचा मोबदला लाभार्थ्यांच्या थेट ब्यांक खात्यात तात्काळ जमा करण्यात यावा. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना नांदेड यांच्यावतीने मा.जिल्हाधिकारी सह मा.मुख्यमंत्रीना निवेदन देण्यात आले.
निवेदन देतेवेळेस
मनसेचे जिल्हाध्यक्ष.रवि राठोड, मानवीसे राज्य उपाध्यक्ष दीपक स्वामी, मनविसे जिल्हाध्यक्ष पवन पाटील, मानवीसे शहराध्यक्ष शुभम पाटील, मानवीसे जिल्हाध्यक्ष शक्ती परमार, मानवाचे जिल्हाध्यक्ष संतोष सुनेवाड, जिल्हा उपाध्यक्ष योगेश मोरे, उत्तर विधानसभा अध्यक्ष विशाल पावडे, भोकर माजी शहर अध्यक्ष आकाश घंटेवाड,मानवीसे शहर सचिव अमर
कोंडराज, मनसैनिक धम्मपाल आढाव, विठ्ठल राठोड ,संजय खराडे,आदिसह शेकड़ो मनसे सैनिक उपस्थित होते.



