उमरखेड आगाराला प्रवाशी राजा दिनाला फज्जा.(विभाग नियंत्रक अमृत कछवे जानुन बुजुन फिरवली पाठ )
ढाणकी प्रतिनिधी -: दि.10/9/2025 उमरखेड आगारात महामंडळाने प्रचलित पद्धतीने आयोजन केले आहे रोजी प्रवाशी राजा दिन ठेवण्यात आले त्या प्रवाशी राजादिनामध्ये मा. जिल्हा नियंत्रक अमृत कछवे यांनी ठराविक कार्यालयीन ताफ्यासह दिलेल्या तारखीला वेळेत हजर राहून येणाऱ्या प्रवाशांच्या आडणी समस्या, तक्रारी , ऐकून त्यावर चर्चा करुन स्थानिक पातळीवरील आगाराच्या प्रशासकीय दृष्टिकोनातून व प्रवाशांच्या हिताच्या एसटीच्या फायद्याच्या दृष्टीने तक्रारी निवारण कराव्या लागतात. परंतु उमरखेड आगारामध्ये मागील झालेल्या प्रवासी राजा दिनामध्ये दिलेल्या तक्रारीची. कोणत्याही प्रकारे दखल व कारवाई केलेली नाही असे निदर्शनास आले. बऱ्याच जणांनी प्रवाशी तोंडी लेखी की तक्ररारी सांगितले त्याचप्रमाणे प्रवासी मंडळाने लेखी मागणी दिली असताना त्यांना दुर्लक्ष केले व त्यांनी वटाण्याच्या अक्षदा दाखवल्या या विभागातील जागृत प्रवासी मंडळ असल्याने या विभागाचा सखोल अभ्यास करून त्यांना माहूर येथील तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ. हे जागृत असल्याबाबत तसेच भावीक भक्तांचा प्रसिद्ध भाग असलेला यांना येणाऱ्या नवरात्रात विशेष म्हणजे गरीबाचा रथ म्हणून ओळखणाऱ्या एसटीकडे कल असतो त्याप्रमाणे ढाणकी येथुन माहुर करीता सटल सेवा कायमस्वरूपी चालू कराव्यात ढाणकी, फुलसांगी, महागाव, धनोडा, माहूर, कारण भक्तांची माय दयाळी हमेशा वाहत असते परंतु या मागणीकडे
विभाग नियंत्रण यांनी याकडे दुर्लक्ष केले येत्या काही दिवसात माहुर यात्रा सुरू होणार आहे याचा फायदा राज्य परिवहन मंडळ मिळेल तसेच प्रवाशाची गैरसोय होत आहेत निवेदन देऊन बरेच महिने झाले असून तरी उमरखेड आगाराने ढाणकी,माहुर सटल सेवा सुरु केली नाही ढाणकी हे शहर नगरपंचायत आहेत व तसेच ढाणकी हे मध्यवर्ती ठिकाण आहे कारण अंदाजे 70 ते 80 खेड्याचा संपर्क येत असते त्यामुळे भाविक भक्त ढाणकी ला येत असतात माहुर जाण्यासाठी सर्व जाती धर्माचे लोक ये -जा करत असतात दि.10/9/2025/ माधवराव मिटकरे प्रवाशी मंडळ ढाणकी यांनी प्रवाशी राजा दिन दुसरें निवेदन आवगत केले ढणकी माहुर बस सेवा सुरु झाली नाहीतर लोकशाही मार्गाने आंदोलन करु ? अध्यक्ष , शेख इरफान, सचिव हिरासिंग चव्हाण , कार्याध्यक्ष नाथा पाटील, ढाणकी येथील प्रवाशी आजीखा पठाण उपस्थित होते सर्वांनी मिळून निवेदन दिले .




