ताज्या घडामोडी

साई (ई) येथे अवैध वाळू तस्करांचा धुमाकूळ.

साई (ई) येथे अवैध वाळू तस्करांचा धुमाकूळ.

 

यवतमाळ विशेष प्रतिनिधी :

गोपाल हरी राठोड.

 

महागांव : महागाव तालुक्यातील.साई (ई) परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू तस्करी सुरू आहे, या वाळू तस्करांमुळे गावातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असुन या अवैध वाळू तस्करांवर कठोर कारवाई करण्याची मागणी साई येथील ग्रामस्थ करीत आहेत व गुरुवार रात्र भर २८ ऑगस्ट रोजी महागाव चे तहसीलदार येथील अवैध वाळू तस्कर हे परीसरातील साई,बोरी,वाकद,चीचपाड, तुळशीनगर व मोहदी या गावातील नाल्यामधून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी करत आहे. या रेती तस्करी मध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी प्रवेश केल्याने मागील काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये रेती तस्करीसंदर्भात आपसात वाद निर्माण होत असल्याने भविष्यात गावातील

कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही, काळी दौलत सर्कल मधील हे अतिसंवेदनशील गाव म्हणून ओळखले जाते, त्यामुळे येथे सुरू असलेली अवैध काळी पिवळी रेती तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. हा वाद रोखण्यासाठी रेती तस्करांवर

तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी काळी दौ.सर्कल मधील ग्रामस्थांनी करत आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *