ढाणकी प्राथ. आरोग्य केंद्रात चक्रधर स्वामी अवतार दिन उत्साहात साजरा.
ढाणकी । प्रतिनीधी : मिलिंद चिकाटी
बाराव्या शतकातील महान तत्त्वज्ञ, समाजसुधारक व महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री. चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन प्राथमिक आरोग्य केंद्र, ढाणकी येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी चक्रधर स्वामींच्या कार्याचा गौरव करताना, त्यांच्या समाजसुधारक विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता अधोरेखित केली. लीळाचरित्र या मराठीतील पहिल्या चरित्रग्रंथाचे नायक म्हणून तसेच स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देणारे आणि अहिंसेचा पुरस्कार करणारे महात्मे म्हणून चक्रधर स्वामींचे योगदान उल्लेखनीय असल्याचे सांगण्यात आले.
कार्यक्रमास डॉ. स्वाती मुनेश्वर, डॉ. महेश भाले (वैद्यकीय अधिकारी), राजकुमार माळवे (नेत्र चिकित्सा अधिकारी), सौ. प्रणिता मेश्राम (LSO), प्रेमसिंग चव्हाण (आरोग्य सहायक), दादाराव हंबर्डे ,सतीश वनवे (आरोग्य सेवक), आर. आर. पुंडे (कनिष्ठ लिपिक) यांच्यासह सर्व आरोग्य सेवक, गट प्रवर्तक, आशा स्वयंसेविका व कर्मचारी उपस्थित होते.




