सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर माहुर शहरात पोलिसांचे पथ संचलन.
श्रीक्षेत्र माहूर नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर
सण उत्सव काळात शहरासह पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दि. 30 जुलै 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक गणेश कराड, यांच्या नेतृत्वात शहरातील प्रमुख मार्गावरून पथ संचलन करण्यात आले.
दि. 7 ते 9 ऑगष्ट 2025 या काळात संपन्न होणाऱ्या नारळी पौर्णिमा (परिक्रमा) यात्रेनिमित्त माहुर येथे सुमारे पाच लाख भाविक दाखल होणार आहेत. या यात्रेदरम्यान गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावी, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, तसेच पोळा, गणेशोत्सव, इत्यादी सण उत्सव शांततेत पार पडावे. कायदा, शांतता, सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने पथसंचलन करण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी सांगितले,
स.पो.नि.पालसींग ब्राह्मण,स.पो.नी.संदिप अन्येबोईनवाड ,पो.हे.कॉ.प्रकाश गेडाम, कैलास जाधव,पवन राउत, ज्ञानेश्वर खंदाडे,चालक जाधव यांचेसह महीला पोलीस कर्मचारी होमगार्ड सहभागी झाले होते. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस ठाण्यातर्फे पथसंचलन करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.




