ताज्या घडामोडी

आई रेणुकेच्या आशिर्वादाने माहूरगडावरुन स्वच्छतेची ऊर्जा घेऊन कामाला लागते.!मंत्री – ना.मेघना बोर्डीकर

आई रेणुकेच्या आशिर्वादाने माहूरगडावरुन स्वच्छतेची ऊर्जा घेऊन कामाला लागते.!मंत्री – ना.मेघना बोर्डीकर

 

श्रीक्षेत्र माहूर/नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड, शेकापूर

 

 

: महिला आणि बालविकास तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर ह्या सोमवार दि.16 जून रोजी माहूर दौऱ्यावर आल्या होत्या.राज्य शासनाचे स्वच्छतादूत द.भ.प. साईनाथ महाराज वसमतकर यांच्या आनंदधाम मठाला भेट देऊन केलेल्या मार्गदर्शनात माहूरगडावरून स्वच्छतेची ऊर्जा घेऊन कामाला लागते, असे प्रतिपादन केले.प्रथम त्यांनी श्री रेणुकामाता मंदिरात जाऊन ‘श्री’ ची विधिवत पूजा अर्चा केली.या पूजाविधीचे पौरोहित्य रवी काण्णव, संजय काण्णव व शुभम भोपी यांनी केली. मातेच्या दर्शनानंतर संस्थान कार्यालयात कोषाध्यक्ष तथा तहसीलदार मुगाजी काकडे, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव यांनी शाल, श्रीफळ व मातेची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला.गडाच्या पायथ्याशी श्री रेणुका माऊली व्यापारी असोसिएशनच्या वतीने शिवसेनेचे शहरप्रमुख विकास कपाटे, राजु सौंदलकर अन्य व्यापाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला.त्यानंतर ना. मेघना बोर्डीकर यांनी श्रीदत्तशिखर संस्थानच्या मंदिरात जाऊन दत्तात्रेय स्वामींचे दर्शन घेतले.

आनंदधाम मठातील कार्यक्रमात पुढे बोलतांना ना. मेघना बोर्डीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातात झाडू घेऊन उभ्या देशाला स्वच्छतेचे महत्व पटवून दिले, प्रत्येक घरात शौचालय मंजूर करून मायमाऊलींचा सन्मान जपला,अशी भावना व्यक्त केली. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने मागील 11 वर्षात राबविलेल्या विविध जनप्रिय योजनेची त्यांनी मुद्देनिहाय माहिती दिली.

स्वच्छतादूत साईनाथ महाराज यांचे कार्य राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचे सारखे अजरामर राहील,असे गौरोद्गगार त्यांनी काढले. यावेळी स्वच्छतादूत साईनाथ महाराज यांनी स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनता आदी विषयावर मार्गदर्शन करून माहूरगडचे धार्मिक महत्व विशद केले.यावेळी व्यासपीठावर द.भ.प.साईनाथ महाराज,खा. नागेश पाटील, जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे,भाजप महिला मोर्चेच्या जिल्हाध्यक्ष संध्याताई राठोड, तालुकाध्यक्ष निळकंठ मस्के,नगरसेवक सागर महामुने,युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विनायक मुसळे,अनिल वाघमारे,रमेश बद्देवार,महिला मोर्चेच्या शहराध्यक्षा स्वाती आडे आदींची उपस्थिती होती.मठाचे वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने व सांगता आनंदाच्या आरतीने झाली. सूत्रसंचलन एस. एस. पाटील यांनी केले, तर भाऊ पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाला भक्तगणांसह भाजप, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

नगराध्यक्ष दोसानीकडून सत्कार, शाळेत केले वृक्षारोपण

 

महिला आणि बालविकास तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर ह्या सोमवार दि.16 जून रोजी माहूर दौऱ्यावर होत्या. तसेच ना.मेघनाताई बोर्डीकर यांचा माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी देखील गडावर यथोचित सत्कार केला.तर गडावरील देवदर्शन व मठावरील कार्यक्रमानंतर मंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा माहूर येथे भेट देऊन परिसरात वृक्षारोपण केले. यावेळेस शाळेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला*.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *