ताज्या घडामोडी

ढाणकी येथे विद्युत सुरक्षा सप्ताह निमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन.

ढाणकी येथे विद्युत सुरक्षा सप्ताह निमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन.

 

ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकाटे.

 

महावितरण कंपनीच्या २०व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त ‘शून्य अपघात महावितरण – शून्य अपघात महाराष्ट्र’ या संकल्पनेतून आज दिनांक १ जुन ६ जुन २०२५ या कालावधीत संपूर्ण राज्यात वर्धापन दिन व विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत असून, आज रविवार दिनांक १ जून २०२५ रोजी उपविभाग महावितरण ढाणकी येथे संपूर्ण ढाणकी शहरातून जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.महावितरण उपविभागीय कार्यालयातून निघालेली रॅली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, एपीजे अब्दुल कलाम चौक, जुना छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुडमेवार चौक, अण्णाभाऊ साठे चौक, शहीद भगतसिंग चौक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ,छत्रपती शिवाजी महाराज चौक, येथुन मार्गक्रमण करुन ३३ के.व्ही. उपकेंद्र ढाणकी येथे रॅलीचे समापन करण्यात आले.

संपूर्ण रॅलीत “विद्युत सुरक्षा पाळा वीज अपघात टाळा” ; “आम्ही सुरक्षेचे शिल्पकार शुन्य अपघाताने करू महावितरणचे ध्येय साकार” अशा घोषणांनी वीज ग्राहकात सुरक्षा विषयी जनजागृती करण्यात आली. वीज खांबाला किंवा स्टे ला गुरे ढोरे बांधू नका ते प्राणांतिक अपघात आमंत्रण होय, ज्वलनशील वस्तूंची साठवणूक वीज तारांखाली करणे धोकादायक आहे, वीज वाहिन्याखाली गोठा/ झोपडी/ घर बांधणे धोकादायक आहे तसेच बेकायदेशीर आहे, आपले जीवन अनमोल आहे – वीज चोरी टाळा सुरक्षित रहा, मालवाहतूक करताना उंचीचे भान ठेवा, बांधकाम करताना वीज तारांना स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या, धातूची सीडी /गज/ सळ्या यांची वाहतूक करताना काळजी घ्या, विजेच्या तारावर कपडे वाळत घालू नका, अशा विविध सुरक्षा विषयी पोस्टरांच्या माध्यमातून वीज ग्राहकांत जनजागृती करण्यात आली.

महावितरण ढाणकीचे उपकार्यकारी अभियंता व्ही.बी.चव्हाण यांचे नेतृत्वात निघालेल्या रॅलीत ,सहाय्यक अभियंता ए. एम .आत्राम ,प्रधान यंत्रचालक संजय पडोळे, प्रभाकर दिघेवार, प्रधान तंत्रज्ञ गजानन राचटकर ,रमेश सुकळकर ,शेख हूसेन बाबु,वरिष्ठ तंत्रज्ञ रवींद्र दवणे ,शैलेश कवाणे, शेख रफिक, कृष्णा गायकवाड, बालाजी बोडके, भीमराव कांबळे, अंकुश आडे, शेख रिजवान, किशोर वाघमारे, मंजू सिंह, धम्मपाल दवणे, दीपक जवने ,अंकुश खराटे ,बालाजी बिट्टेवार ,कृष्णा कत्तुलवाड, विशाखा आठवले ,रामदास पांचाळ, शेख अजीम बेग, तोरकड, राकेश काळबांडे, संदीप सुरोसे, सय्यद कलीम, शेख सलीम, दत्ता कदम, विजय पहुरकर यांच्यासह ढाणकी, साखरा, बिटरगाव, दराटी सेंटरचे सर्व कर्मचारी, सर्व बाह्य स्त्रोत कर्मचारी, चंद्रभान बाभळे व त्यांचे एजन्सी चे सर्व कर्मचारी, विजय जाधव,बाळू पडोळे,ज्ञानेक्ष्वर महाजन व सर्व सुरक्षारक्षक यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला.

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *