माहूर तालुक्यातील मौजे शेकापूर येथे 15/02/25 रोजी पारंपरिक पद्धतीने संत श्री सेवालाल महाराज यांची जयंतीची जय्यत तयारी.
नांदेड प्रतिनिधी / गणेश राठोड.
tv9माझा लाईव्ह न्युज चे नांदेड जिल्हा प्रतिनिधी गणेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली नवतरुण सेवालाल मंडळ शेकापूर यांच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे..
विशेष म्हणजे 15 फेब्रुवारी रोजी किनवट/माहूर उपविभागीय पोलिस अधिकारी श्री शिंगारे साहेब यांच्या हस्ते संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करून पूजा अर्चना करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माहूर पोलिस स्टेशन चे दबंग सहायक पोलिस निरक्षक शिवप्रकाश मुळे राहणार आहेत
तसेच आभार प्रदर्शनासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदेड जिल्हा अध्यक्ष, श्री.सूनील बेहेरे हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. आणि सूत्रसंचालन हे भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती चे नांदेड जिल्हा अध्यक्ष विनोद भाऊ भारती हे करणार आहेत..
या सोबत च मौजे शेकापूर येथील सर्व नागरिकांना/ जनतेला आव्हान करण्यात येत आहे की, ज्या कोणालाही स्वेच्छेने जयंती करिता वर्गणी द्यायची आहे, त्यांनी गावातील नायक अर्जुन चव्हाण यांच्याकडे आणून द्यावे. ही मंडळातर्फे विनंती करण्यात येत आहे.