वादग्रस्त सायफळ वाळू घाट काढला खोदून.
नायब तहसीलदार उर्फ महाकाल कैलास जेठे यांची रात्रीला कारवाई.
माहूर प्रतिनिधी / गणेश राठोड.
श्रीक्षेत्र माहूर तालुक्यातील पैनगंगा नदी पात्रावर अतिदुर्गम भागात असलेल्या मौजे सायफळ वाळू घाटावरून वारू वाळू चोरी होत असल्याच्या वावड्या उठवून नायब तहसीलदार तथा महाकाल नावाने प्रसिद्ध झालेले कैलास जेठे यांचे विरुद्ध वाळू तस्करांनीच विनाकारण सोशल मीडियावर मजकूर टाकून विनाकारण बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याने तहसीलदार किशोर यादव यांच्या आदेशाने नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी रात्रीला जाऊन तो वादग्रस्त सायफळ वाळू घाट जेसीबीने खोदून काढत बेल पत्र वाहून आल्याने पुन्हा एकदा त्यांच्या धडक कारवाईची वाळू तस्करांनी धास्ती घेतल्याचे दिसत आहे
वाईबाजार परिसरातील वाळू तस्करीत अप्रत्यक्ष सहभाग असणाऱ्या काही मंडळींनी नायब तहसीलदार उर्फ महाकाल नावाने अर्ध्या रात्री कारवायासाठी प्रसिद्ध असलेले कैलास जेठे यांनी कारवाया करू नये म्हणून सोशल मीडियावर विनाकारण वावड्या उठवत सायफळ वाळू घाटा वरून वाळू चोरी होत असल्याच्या पोस्ट टाकत कारस्थान रचून बदनामी सुरू केली होती यामध्ये काही पांढरपेशा तस्करांचाही हात होता परंतु कैलास जेठे यांनी बदनामीला भीक न घालता रजेवरून हजर होताच तात्काळ सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली तहसीलदार किशोर यादव यांच्या आदेशानुसार तडक सायफळ घाट गाठत जेसीबी द्वारे संपूर्ण घाट रात्रीलाच खोदून काढल्याने तस्करांनी त्यांच्या या धडक कारवाईची जास्ती घेतल्याचे दिसत आहे
सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली तहसीलदार किशोर यादव हे वाळू तस्करांच्या मुळावर उठल्याने वाळू तस्करी जवळपास बंद झाली असून यामुळे मात्र वाळू तस्करांचा आणि त्यांच्या पाठीराख्यांची आग होऊन महसूल विभागाच्या कारवाईच्या विरोधात सोशल मीडियावर काही चमच्यांनी बदनामीकारक मजकूर टाकून महसूल विभागाचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू केला होता परंतु महसूल विभागाने वाळू तस्कर विरोधात धडक कारवाया सुरू ठेवल्याने वाळू तस्करांचे व पांढरपेशा पाठीराख्यांचे पित्त खवळून उलट सुलट वावड्या उठवल्या गेल्याने महाकाल उर्फ नायब तहसीलदार पुन्हा महाकालच्या रूपात थेट सायफळ घाट गाठून त्यांनी घाट खोदून काढल्याने वाळू तस्करांची पंढरी घाबरली असून वाळू तस्करीत एखाद्या ट्रॅक्टर टिप्पर चालकाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग आढळून आल्यास त्याचे घरूनही ट्रॅक्टर जप्तीची कारवाई करण्यात येईल असा कडक तहसीलदार किशोर यादव महाकाल उर्फ गायब तहसीलदार कैलास जेठे यांनी दिला आहे यावेळी सोबत पोलीस पाटील हेमंत गावंडे पाटील महसूल सेवक पवन पाटील सोबत होते