आरोग्य ताज्या घडामोडी

ढाणकी मायेची सावली देणाऱ्या दोन वृक्षाची अवैध कतल स्वीकृत नगरसेवक यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी 

ढाणकी मायेची सावली देणाऱ्या दोन वृक्षाची अवैध कतल

 

स्वीकृत नगरसेवक यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी

 

ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकाटे

 

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील बिटरगाव रस्त्यावर अवैधरित्या दोन वृक्षाची कत्तल करण्यात आली आहे हे वृक्ष सार्वजनिक बांधकाम विभागाचे असून याबाबतीत अभियंता यांना वेळोवेळी पर्यावरण प्रेमींनी माहिती देऊन सुद्धा अभियंता खसावत याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे . नगरपंचायत नगरसेवक पदाचा दूर उपयोग करून अवैध वृक्षाची तोड करत असल्याचे वृक्षप्रेमी कडून बोलल्या जात आहे व त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

शहरातील नगरपंचायत नगरसेवक संजय गंदेवार उर्फ (बाळासाहेब गंदेवार ) यांच्या मालमत्तेत असलेले काही रस्त्यावरील वृक्ष नगरपंचायत, बांधकाम विभाग व वनविभाग कडून परवानगी न घेता दोन लिंब या जातीचे डेरेदार वृक्ष तोडत असताना काही पर्यावरण प्रेमीनी हे वृक्ष तोडू नका असे सांगितले असता हे माझ्या मालकीचे वृक्ष आहे असे सांगत त्यांनी दोन वृक्षाची कतल केल्याचा प्रकार ढाणकी शहरात घडला आहे.

 

या बाबतीत नगरपंचायत ढाणकी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जाब विचारले असता, त्यांनी सोमवारी याबाबतीत चौकशी करू असे आश्वासन पर्यावरण प्रेमींना दिले आहे,तसेच त्या दोन वृक्षाची अवैध कत्तल करण्यात आली आहे असे सार्वजनिक बांधकाम विभाग उमरखेड अभियंता वसंत खासावत यांना याबाबतीत विचारणा केली असता कोणतीही परवानगी देण्यात आली नाही असे त्यांनी सांगितले.

तसेच ढाणकी मध्ये वृक्ष संवर्धन साठी निसर्ग वृक्ष संवर्धन समिती असून त्यांनी याबाबत मोठा माणूस असल्यामुळे चुप्पी साधली आहे.याबाबत आम्ही काहीही तक्रार करणार नसल्याचे संतोष तिरमकदार यांनी बोलल्यामुळे पर्यावरण प्रेमी नाराज झाले आहे. गरिबाने अपराध केला तर त्यांच्यावर कार्यवाही करणार का असा प्रश्न त्यांना केला आहे.

प्रवाशांना मायेची सावली देणाऱ्या या वृक्षाची कत्तल केल्यामुळे , महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) संरक्षण व जतन अधिनियम 1975 अंतर्गत दोषी मालमत्ता धारकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी करत आहेत.

संजय गंदेवार यांचा अर्ज नगरपंचायत ला प्राप्त झाला असून त्यांना वृक्ष तोडण्यासाठी कोणतीही परवानगी दिली नसून यावर चौकशी करून कारवाई करू.

 श्री चौधरी साहेब   मुख्य अधिकारी नगरपंचायत ढाणकी

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *