ताज्या घडामोडी

अखेर माधवराव मिटकरे प्रवासी मंडळ व पुण्य श्लोकअहिल्याबाई होळकर माध्यमीक शाळा यांची मागणी वरून हिमायतनगर बस सेवा सुरु 

अखेर माधवराव मिटकरे प्रवासी मंडळ व पुण्य श्लोकअहिल्याबाई होळकर माध्यमीक शाळा यांची मागणी वरून हिमायतनगर बस सेवा सुरु

 

ढाणकी प्रतिनिधी :मिलिंद चिकाटे.

 

उमरखेड, ढाणकी वरून हिमायतनगर बस बंद असल्यामुळे विद्यार्थी व प्रवास्यांना ये जा करण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत होता. शाळकरी विद्यार्थी यांना फ्री पास स्वलत चा लाभ मिळत नव्हता. हिमायतनगर बस बंद असल्यामुळे त्यांना शाळेत जाण्यासाठी खाजगी वहानाने जास्त पैसे देऊन शाळेला जावे लागत,असल्यामुळे या महागाई मध्ये पालकांना आर्थिक फटका बसत होता. विद्यार्थी आणि प्रवास्यांना होणारा त्रास बघता पुण्य श्लोकअहिल्याबाई होळकर माध्यमीक शाळेचे मुख्यद्यापक आणि माधवराव मिटकरे प्रवाशी मंडळ यांनी बस आगार व्यवस्थापक प्रमोदिनी किनाके यांना निवेदन देऊन उमरखेड ते हिमायतनगर बस सुरु करण्यासाठी विनंती केली होती.बस आगार व्यवस्थापक किनाके मॅडमनी विद्यार्थी आणि प्रवासांची होणारी गैरसोय होत असल्याची गंभीर बाब लक्षात येताच मुख्यद्यापक आणि माधवराव मिटकरे प्रवाशी मंडळ यांच्या निवेदनाची दखल घेत बस सुरु केली.बस सुरु होताच विद्यार्थी, प्रवासी, मुख्यद्यापक आणि माधवराव मिटकरे प्रवाशी मंडळ यांनी आगार व्यवस्थापक यांचे आभार मानले माधवराव मिटकरे प्रवाशी मंडळ चे आध्यक्ष शेख इरफान शेख गुलाब सचिव हिरासिंह चव्हाण, कार्याध्यक्ष नाथा पाटील, उपाध्यक्ष शैलेंद्र साखरे सल्लागार, विद्वान केवटे विदयार्थी युवा मोर्चा संघटना ,मा.जि.पं सदस्य रामराव गायकवाड , सदस्य बाबा खान,जन्नावार ,यांनी अथक प्रयत्न केले

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *