इंद्रनील नाईक यांचे राज्यमंत्री यांची निवड. जेसीबीतून फुले उधळीत फटाके फोडून गुलाल उधळून त्यांचे पुसदनगरीत जल्लोषात स्वागत.
पुसद गोपाल राठोड यांची रिपोट.
पुसद : राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचे.रविवारी पहिल्यांदा आगमन होताच जेसीबीतून फुले उधळीत फटाके फोडून गुलाल उधळून त्यांचे पुसदनगरीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी शहरातील प्रमुख मार्गाने डी.जे व ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
इंद्रनील नाईक यांची उद्योग, उच्च व तंत्रशिक्षण, मत्स्य व जलसंधारण.राज्यमंत्री म्हणून राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर पुसद शहरात त्यांचे दुपारी 3 वाजता आगमन झाले. पुसद ते दिग्रस मार्गावरील माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यानंतर नागरिकांनी मार्गात ठिकठिकाणी मंत्री नाईक यांचे स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवराय, तर बस स्टॅन्ड चौकात महात्मा फुले यांच्या.पूर्णाकृती पुतळ्याला नाईक यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या मिरवणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गावखेड्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत होता.ठाणेदार उमेश बेसरकर, वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक नीलेश शेंबडे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.