उमरखेड / ढाणकी येथे महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.
प्रतिनिधी,ढाणकी, मिलिंद चिकाटे
डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांचा वारसा आजही देशभरात प्रेरणास्त्रोत आहे. सामाजिक न्याय, शिक्षण आणि समता या क्षेत्रात त्यांनी सुरू केलेली क्रांती नेहमीच प्रासंगिक राहील. त्यांच्या कल्पना आणि योगदान वंचितांच्या सक्षमीकरणासाठी मैलाचा दगड ठरले. भारतामध्ये संविधान आणि लोकशाहीची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा बाबा साहेब डॉ भीमराव आंबेडकर यांचे नाव ठळकपणे घेतले जाते. त्यामुळेच भारतीय इतिहासात 6 डिसेंबर ही महत्त्वाची तारीख म्हणून नोंदवली जाते. या दिवशी देशभरात महापरिनिर्वाण दिन म्हणून भीमराव आंबेडकर यांना आदरांजली वाहिली जाते. या दिवशी भारताच्या राज्यघटनेचे निर्माते, समाजसुधारक तमाम बहुजनांचे मसिहा भारतरत्न परमपुज्य ,
डॉक्टर भीमराव रामजी
आंबेडकर यांचे 1956 मध्ये महापरिनिर्वान झाले,
वास्तविक, भारतात 6 डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो. महापरिनिर्वाण म्हणजे बौद्ध धर्मातील तृष्णांची मुक्ती मिळवून सत्य मार्गावर आरूढ होणे आणि आंबेडकरांच्या महान अमूल्य देशसेवेचा सन्मान आणि त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी संकल्प दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
परमपुज्य,
डॉक्टर भीमराव रामजी
आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. ते त्या काळात अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या वर्गात जन्माले आले होते. परमपुज्य
डॉक्टर भीमराव रामजी
आंबेडकरांना त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात जातीय भेदभाव आणि सामाजिक विषमतेचा सामना करावा लागला. मात्र त्यांचे वडील रामजी मालोजी सकपाळ यांनी त्यांना शिक्षणाची प्रेरणा दिली.
आंबेडकरांनी आपल्या शिक्षणातून समाजात बदल घडवून आणण्याचे ठरवले. त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आणि नंतर कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, यूएसए येथून उच्च शिक्षण घेतले. त्यांनी कायदा आणि अर्थशास्त्र या विषयात डॉक्टरेट पदव्या मिळवल्या. त्यांच्या शिक्षणाने त्यांना केवळ एक निपुण विद्वानच नव्हे तर समाजसुधारक बनण्याची प्रेरणा दिली.
1947 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर, परमपुज्य
डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांना संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांची राज्यघटना जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीसाठी पायाभरणी ठरली. यामध्ये सर्व नागरिकांना समानता, स्वातंत्र्य आणि न्यायाचा अधिकार सुनिश्चित करण्यात आला.
परमपुज्य,
डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांनी 1956 मध्ये दलित समाजासह बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांचा असा विश्वास होता की बौद्ध धर्माची तत्त्वे सामाजिक समता आणि बंधुत्वाला प्रोत्साहन देतात.
6 डिसेंबर 1956 रोजी दीर्घकाळ आजारी असलेले,
परमपुज्य,
डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचे त्यांचे अनुयायी हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा करतात.
यादिनानिमित्त ढाणकी शहर येथे बुद्ध विहार पासून रॅली काढली. व बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले.
तेथून रॅली संविधान चौक येथे आली व सर्व बुद्ध उपासक, उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते व सर्वांनी विनम्र अभिवादन केले व कार्यक्रमाची सांगता केली.