यवतमाळ जील्ह्यातील ऊस ऊत्पादक, साखर कारखाने १५ नोव्हेबंर पुर्वी सुरु करण्याचे आदेश.
यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर
यवतमाळ जिल्ह्यातील कारखाना 15 तारखेच्या पूर्वी चालू करण्यात यावे अन्यथा ऊसाला दरमहा दोनशे रूपये नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी मुख्यमंत्री मा एकनाथ शिन्दे यांना निवेदनाद्वारे केली आहे यावर्षी खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे हातचा गेला आसुन बाजारात भाव सुध्दा नाही त्यामुळे संपुर्ण मदार ही ऊसावर अवलंबुन आसताना शासनाने विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन साखर कारखाने पंधरा नोव्हेबंर नंतर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णरयामुळे ऊस गाळपास पंधरा ते सोळा महीणे लागणार तोपर्यत ऊसाला दशी पडणे, तुरा येणे, पांगशा फुटणे यामुळे ऊसाचे प्रचंड घट होणार आहे त्यामुळे ऊस ऊत्पादक शेतकरी आस्मानी आणी सुलतानी संकटाने नेस्तनाबुत होणार आहे त
या करता मा मुख्यमंत्री यांनी हा निर्णय रद्द करावा आथवा दरमहा दोनशे रूपये नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली आहे अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल असे सांगितले यावेळी गोविंदराव देशमुख (सवनेकर) बळीराजा संघटना, स्वाभीमानी शेतकरी संघटणेचे पदाधीकारी व जील्ह्यातील आनेक ऊस ऊत्पादक ऊपस्थीत होते