महागाव नगर पंचायतवर महाविकास आघाडीचा झेंडा कायम)
महागांव/ एस के शब्बीर
अडीच वर्ष मुदत संपत असलेल्या नगर पंचायतीवर प्रशासक नेमण्याचा निर्णय मागे घेत या नगर पंचायतिच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा कार्यकाळ यापुढे अडीच वर्ष न ठेवता पूर्ण पाच वर्ष ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. यामुळे मुदत संपत आलेली महागाव च्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांना दिलासा मिळाला असून नगर पंचायत वर पुढील अडीच वर्ष महाविकास आघाडीचा झेंडा कायम राहणार आहे.
राज्यातील १०५ नगर पंचायतीची निवडणूक अडीच वर्षापुर्वी झाली होती त्यामुळे या नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा कार्यकाळ १४ ऑगस्ट रोजी संपत असल्याने या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण काढणे आवश्यक असताना राज्य शासनाने आरक्षण न काढता या नगर पंचायत वर शासकीय अधिकायांची प्रशासक म्हणुन नेमणूक करण्याचें परिपत्रक काढले होते. नगर पंचायतीमध्ये लोकशाही मागार्ने निवडून आलेले नगरसेवक असताना प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतल्याने याविरोधात सर्वत्र नाराजीचा सुर उमटत असल्याने याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये बसण्याची शक्यता राजकीय विश्लेषक वर्टवित होते. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाने दिनांक १३ ऑगस्ट रोजी झालेल्या तातडीच्या बैठकीत नगर पंचायतवर प्रशासक नेमण्याचा निर्णय मागे घेत अडीच वर्षांची मुदत संपत असलेल्या नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे अडीच वर्ष कार्यकाळ पुर्ण केलेल्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांना दिलासा मिळाला असुन ते पुढील अडीच वर्ष पदावर कायम राहणार आहेत. अडीच वर्ष कार्यकाळ संपत असलेल्या नगर पंचायतीमध्ये महागाव नगर पंचायतचा समावेश होता मंत्रिमंडळाच्या या निर्णयाने या ठिकाणी असलेल्या नगराध्यक्षा सौ सुनंदा दिलीपराव कोपरकर व उपनगराध्यक्ष प्रमोद भरवाडे यांना दिलासा मिळाला आहे. साधारणतः सव्वा वषापूर्वी महागाव मध्ये शिवसेनेने भाजपची साथ सोडून काँग्रेसचा हात पकडून सोडून काँग्रेसचा हात पकडुन सत्ता स्थापन करीत महा विकास आघाडीचा झेंडा फडकवला होता. मुदत संपल्याने भाजपने काहीही करून सत्ता परत मिळवायची हा चंग बांधुन महागाव मध्ये राजकीय हालचालींना वेग दिला होता परंतु महायुती सरकारच्या या निर्णयाने महागाव नगर पंचायत वर महाविकास आघाडीची सत्ता कायम राहणार असल्याने भाजपच्या मनसुब्यांवर पाणी फेरले आहे.
राज्य सरकारने नगर पंचायत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा कार्यकाळ अडीच वर्षांवरून पाच वर्षांचा करण्याचा निर्णय घेतला आहे तो स्वागतार्ह असुन यामुळे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी होणाऱ्या घोडे बाजाराला आळा बसण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच शहराच्या विकासासाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांनी आखलेले व्हिजन पुर्ण होण्यास हातभार लागुन शहराचा संपुर्ण सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होईल.
शैलेश कोपरकर
(गटनेता महागाव नगर पंचायत
राज्यातील १०५ नगर पंचायतींचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपत असल्याने नगराध्यक्ष पदाचे आरक्षण काढणे अपेक्षित असताना अगोदर प्रशासक नेमण्याचा व आता कार्यकाळ वाढविण्याचा निर्णय घेतला कारण राज्यातील या १०५ नगर पंचायतीपैकी बहुतांश नगर पंचायतींवर महायुतीची सत्ता आहे. नगराध्यक्ष पदाचे आरक्षण काढल्यास या नगर पंचायतीवर सत्ता परिवर्तन होवून महाविकास आघाडीची सत्ता येण्याची धास्ती घेतल्यामुळेच राज्य सरकारने हा मुदत वाढीचा निर्णय घेतला आहे.
प्रमोद भरवाडे
(उपनगराध्यक्ष न. पं. महागाव)