आरोग्य ताज्या घडामोडी

महागाव/खडका येथे मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर संपन्न

 

प्रतिनिधी एस के शब्बीर

– महागाव तालुक्यातील खडका येथे लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई, शिवसेना उबाठा उमरखेड महागाव विधानसभा व लोककल्याण बहुउद्देशीय संस्थेद्वारा आयोजित पक्षप्रमुख मा श्री उद्धव ठाकरे साहेब (माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य)व मा. श्री खा. नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली लोकसभा )यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य तपासणी ,नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व औषधी वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. राजेंद्र पुरोहित संचालक बाबासाहेब नाईक सहकारी सूतगिरणी, सौ. कमलबाई अरुणराव देशमुख सरपंचा ग्रामपंचायत खडका, नितीन ठोके पोलीस पाटील, आनंदराव देशमुख, बळवंतराव चवरे, अरुणराव देशमुख, तुकाराम शिंदे, साहेबराव देशमुख उपस्थित होते. या शिबिरात डॉ.संजय यादव ,डॉ. अनिल चव्हाण, डॉ. प्रवीण घाटोळ या डॉक्टर मंडळींनी१७५ रुग्णांची तपासणी केली व औषधीचे वाटप केले १०० रुग्णांना चष्मे वाटप केले तर १८ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आढळून आले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्रीदत्तराव कदम उपसरपंच , राजेंद्र ठाकरे, डॉ.संदीप शिंदे, दशरथ मारटकर, चंद्रकांत देशमुख, जगदीश भामकर, संजय भोयर, गोलू ठाकरे, चंद्रशेखर भामकर, श्रीकांत जिल्हरवार ,माधव मारटकर यांनी प्रयत्न केले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *