आरोग्य

विविध समस्याची गटारगंगा रस्त्यावर .(नगरपंचायत व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष)     

विविध समस्याची गटारगंगा रस्त्यावर .(नगरपंचायत व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष)

 

ब्यूरो रिपोर्ट/अजीज खान

 

जिकडे तिकडे पाणीच पाणी गंगा वाहे चहू बाजूनी अशी गत शहरातील रस्त्याची असून सर्वत्र रस्त्याने गंगा वाहते त्या प्रमाणे पाणीच पाणी दिसते, रस्त्यात पाणी जाण्यासाठी नालीची सुद्धा आवश्यकता आहे .प्रभाग १६ व १७ मध्ये नगरपंचायत ते कस्तुरबा शाळेपर्यंत नाली नसल्यामुळे पाणी पूर्नत रस्त्याने वाहते .

ढाणकी येथील रस्ते अतिशय खडेमय झालेले असून,रस्त्यात ढाणकी येथील प्रभाग क्र.सोळा व सत्रा हा रस्ता यात काही अपवाद नाही. या मुख्य रस्त्यात जास्त पाऊस झाल्यास दोन ते तीन फूट पाणी वाहत असल्यामुळे नागरिकांना अत्यंत दाहक पद्धतीने त्रास सहन करावा लागत आहे.या रस्त्यात दवाखाना,मेडिकल, सोसायटी ,नगर पंचायत ,कस्तुरबा गांधी शाळा, गुलाबसिंग ठाकूर शाळा आहेत . तसेच हा रस्ता बसस्टैंड वर जातो. शाळेतील चिमुकले,कस्तुरबा गांधी शाळेतील विद्यार्थी ,इथून जाणारा मजूरदार,शेतकरी , तसेच ढाणकी येथील सर्व जनसामान्य लोकांना यातून आणखी किती दिवस त्रास सहन करावा लागेल हे कुणास ठाऊक. या रस्त्यात पाऊस झाला की दोन ते तीन फूट पाणी सर्वदूर रस्त्याने वाहताना दिसते रस्त्यातील खडे दिसे नासे होतात. त्यामुळे कोणती दुर्घटना केंव्हा होऊ शकते सांगता येणे अशक्य आहे.रस्ता हा रहदारीचा असून इथून वाहने चालवताना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. वारंवार नगर पंचायत मध्ये गेल्या वर्षी अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा नगर पंचायतनी कोणतीही ठोस भूमिका बजावलेली दिसून येत नाही.कोणती दुर्घटना झाल्यास यास जबाबदार कोण?असा सवाल जवाब ढाणकी शहरवासी करताना दिसत आहेत. दरवर्षी या रस्त्यात कच्चा मुरूम टाकून थातूर मातुर स्वरूपाचे खड्डे बुजवली जात आहे .मात्र पक्क्या रस्त्यासाठी लोकप्रतिनिधींनी अद्याप मागणी केलेली दिसून आलेली नाही.असे गावकरी बोलत आहे.खड्डे बुजविण्यासाठी माळावरील लाल मिश्रीत खडक दर वर्षी टाकला जातो त्यात खूप मोठमोठाले दगड येत असतात.रस्त्याची समस्या मिटण्या ऐवजी अधिकच गंभीर होत जाते.रस्त्यात टाकलेल्या त्या दगडामुळे,पायाला ठेचा लागत असतात.रस्त्यात पाणी असल्यास दगड सुद्धा दिसत नाहीत.यात दुचाकी कुणाच्या अंगावर जाईल हे सुद्धा सांगता येत नाही.त्यामुळे रस्त्याची डाग डुग करण्याऐवजी रस्ता ,व नाली नवीन बनवण्यात यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *